SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गेल्या ५ वर्षांच्या काटकसरी कारभारावर ठरावधारकांचा विश्वास : आमदार सतेज पाटीलगोकुळचे माजी संचालक सत्यजीत पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करवीरच्या राजकारणात नवा ट्विस्टकसबा बावडा येथे 'कबाड से जुगाड' बाल विद्यार्थी कार्यशाळा उत्साहात आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा शोध घ्यावा : राज्यपाल जिष्णु देव वर्माराज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शनअसोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट महाराष्ट्रचे ४७ वे वार्षिक 'मॅपकॉन' अधिवेशन कोल्हापुरातस्वाईन फ्ल्यूबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी : आरोग्य विभागाचे आवाहनसहकारमहर्षी शामरावआण्णा पाटील यड्रावकर यांच्या स्मृतिस अभिवादनहुपरी-कोल्हापूर मार्गावरील रखडलेल्या पुलाचे काम तात्काळ पूर्ण करा; शिवसेनेचा आक्रमक पवित्रा, अन्यथा रास्ता रोकोचा इशाराचैनीसाठी घरचाच घात! वडिलांच्याच घरातून लांबवले १० लाखांचे दागिने; करवीर पोलिसांकडून घरफोडीचा पर्दाफाश, चक्क 'मुलगाच' निघाला चोर

जाहिरात

 

कसबा बावडा येथे 'कबाड से जुगाड' बाल विद्यार्थी कार्यशाळा उत्साहात

schedule29 Sep 26 person by visibility 149 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती संचलित राजर्षी शाहू विद्यामंदिर क्र. ११ (सेंट्रल स्कूल), कसबा बावडा, कोल्हापूर येथे _"सुका कचरा व्यवस्थापन व ई-कचरा : समस्या आणि उपाय"_ या विषयावर आधारित *"कचऱ्यातून कला : टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचे सादरीकरण"* ही बाल विद्यार्थी कार्यशाळा अत्यंत उत्साहात व कल्पकतेने संपन्न झाली.

या कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षण, स्वच्छता आणि कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन याबाबत जाणीव निर्माण करणे हा होता. बालवाडी ते इयत्ता ६ वी पर्यंतच्या चिमुकल्यांनी टाकाऊ वस्तूंपासून अत्यंत सुंदर आणि उपयोगी वस्तू तयार करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी नारळाच्या शेंडीपासून झोपडी, प्लास्टिकच्या बाटलीपासून पेन स्टँड, फुलदाणी, पुठ्ठ्यापासून शुभेच्छा पत्रे, कागदापासून सजावटीच्या वस्तू, नारळाच्या करवंटीपासून शोभेच्या वस्तू अशा विविध कलाकृती सादर केल्या.

या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले  अमित पोटकुले आणि  तुकाराम लाखे यांनी विद्यार्थ्यांना टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ साहित्य कसे बनवता येते याचे प्रात्यक्षिकासह अतिशय सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. कचरा ही समस्या नसून संपत्ती आहे, हे त्यांनी उदाहरणांसह पटवून दिले.

कार्यक्रमाचे स्वागत शाळेतील उपक्रमशील शिक्षक  उत्तम कुंभार,  उत्तम पाटील,  रावसाहेब किर्तीकर आणि  विद्या पाटील यांनी केले.

यावेळी बालवाडीच्या मुख्याध्यापिका  कल्पना पाटील, सहकारी मदतनीस  सावित्री काळे, आरोग्य मित्र मुकादम  मनोज कुरणे,  प्रभुदास दाभाडे,  विशाल चव्हाण* हे विशेष उपस्थित होते.

या उपक्रमात इयत्ता २ री ते ६ वी च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यामध्ये अमृता ठोंबरे,  दुर्गा लाखे,  मंजिरी घोलपे,  आराध्या पोवार,  माधवी ठोंबरे,  अथर्व कांबळे,  स्वरा दाभाडे,  पायल पाटील,  आराध्या काळे इत्यादी विद्यार्थ्यांचा समावेश होता.
या संपूर्ण कार्यशाळेचे आयोजन आणि संकल्पना केंद्र मुख्याध्यापक डॉ.  अजितकुमार पाटील यांची होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेने नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत.
कार्यक्रमाचे आभार दिपाली यादव यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, भारतवीर मित्र मंडळाचे पदाधिकारी, पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी प्रेम आणि सृजनशीलता वाढते, असे मत व्यक्त केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes