राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन
schedule29 Sep 26 person by visibility 111 categoryराज्य
कोल्हापूर : राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी श्री अंबाबाई महालक्ष्मीचे दर्शन घेऊन वेदोक्त संकल्प पूजा केली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी श्री अंबाबाईची प्रतिमा देऊन त्यांचे स्वागत केले. यानंतर राज्यपाल श्री वर्मा यांनी मातुर्लिंग श्री महादेव व श्री गणेशाचे दर्शन घेऊन प्रार्थना केली.
यानंतर पुरातत्व विभागाच्या वतीने अंबाबाई मंदिर परिसरात सुरु असलेल्या जतन आणि संवर्धन कामाची पाहणी त्यांनी केली. याकामाच्या सद्यस्थितीबाबत जिल्हाधिकारी डॉ. राठोड व धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नेर्लेकर यांनी माहिती दिली.
यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे , राज्यपालांचे परिसहायक नवदीप अगरवाल, करवीर उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले, तहसीलदार स्वप्नील पवार, देवस्थान समितीच्या सचिव वर्षा साळुंखे, व्यवस्थापक महादेव दिंडे, तसेच देवस्थानचे पुरोहित प्रमोद उपाध्ये, बाळासाहेब दादरणे आदी उपस्थित होते.