SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिक्षकांच्या हक्कांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार कौस्तुभ गावडे यांचा ठाम पाठपुरावा!उसाच्या दराची कोंडी फोडा, अन्यथा शेतकरी नुकसान सहन करणार नाही! : आमदार सतेज पाटील यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोलशिवाजी विद्यापीठात 'संगीत वाद्यांची दुरुस्ती व मूलभूत देखभाल' कार्यशाळेचे यशस्वी आयोजनकोरे अभियांत्रिकीत सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स शाखेचे उद्घाटनसंस्थांच्या माध्यमातून शेतकरी सभासदांचे हित जपण्याचे काम कौतुकास्पद : अजय पाटील यड्रावकरताणतणावमुक्त जीवन: काळाची गरज आणि आंतरराष्ट्रीय ताणतणाव जागरूकता दिनस्थानिक स्वराज्य संस्था बहुमताने चालायला हव्यात, मोडून काढणे योग्य नव्हे : आमदार सतेज पाटील श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात नवनिर्वाचित शिक्षक आमदार कौस्तुभ गावडे यांचा जाहीर सत्कार!विकसित भारत युवा संवाद कार्यक्रम : प्रशिक्षणार्थींना लोकशाही मुल्यं, मतदान जनजागृती आणि जबाबदार नागरिकत्वाबाबत खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून मार्गदर्शनगोकुळमध्ये दूध उत्पादकांच्या कौलाचा अनादर; लोकशाही वाचवण्यासाठी पत्रकारांनी आवाज उठवावा - आमदार सतेज पाटील यांची साद

जाहिरात

 

कोरे अभियांत्रिकीत सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स शाखेचे उद्घाटन

schedule04 Nov 26 person by visibility 135 categoryशैक्षणिक

वारणानगर : तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी वारणानगर येथे यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाच्या वतीने सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स महाविद्यालयीन विद्यार्थी शाखेचा उद्घाटन व पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न झाला. 

वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे व वारणा विद्यापीठाचे कुलगुरू, डॉ. डी.टी. शिर्के यांचे मार्गदर्शन लाभले 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी एन. एच. पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून केशव ताम्हणकर, तर सन्माननीय अतिथी म्हणून श्री वारणा शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डॉ. के. आय. पाटील, अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे, विभागप्रमुख डॉ. पी. व्ही. मुळीक, विभागाचे शैक्षणिक समन्वयक, प्रा.जी. एस. कांबळे यांच्यासह विद्यापीठाचे अधिकारी, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून एसएइ विद्यार्थी शाखेचे उद्घाटन करण्यात आले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा परिचय करून देत त्यांना पदभार प्रदान करण्यात आला.

प्रमुख पाहुणे केशव ताम्हणकर यांनी एसएइ या व्यावसायिक संस्थेचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांनी विविध तांत्रिक स्पर्धा, कार्यशाळा आणि उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात एन. एच. पाटील यांनी वाहनांची रचना, इंजिन तंत्रज्ञान, मानवी अभियांत्रिकी आणि प्रवाशांच्या सुविधांसह वाहन उद्योगातील आधुनिक तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी तांत्रिक व व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्यासाठी एसएइ च्या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांनी व्यावसायिक संघटनांमधील सहभागामुळे विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान, व्यावहारिक कौशल्ये आणि करिअरच्या विविध संधी उपलब्ध होतात, असे नमूद केले. विद्यार्थ्यांसाठी परिषद, कार्यशाळा व तांत्रिक स्पर्धांचे आयोजन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

डॉ. अर्चना नेमा यांनी एजंटिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या विषयावर मार्गदर्शन करताना त्याची संकल्पना, उपयोग आणि भविष्यातील संधी स्पष्ट केल्या.

स्वागतपर भाषणात विभागप्रमुख डॉ. पी. व्ही. मुळीक यांनी विभागातील शैक्षणिक उपक्रम, प्राध्यापकांची संख्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रवेशसंख्येचा आढावा घेतला. आभारप्रदर्शन एसएइ फॅकल्टी ॲडव्हायझर प्रा. एस. एम. गिडवीर यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes