SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिक्षकांच्या हक्कांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार कौस्तुभ गावडे यांचा ठाम पाठपुरावा!उसाच्या दराची कोंडी फोडा, अन्यथा शेतकरी नुकसान सहन करणार नाही! : आमदार सतेज पाटील यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोलशिवाजी विद्यापीठात 'संगीत वाद्यांची दुरुस्ती व मूलभूत देखभाल' कार्यशाळेचे यशस्वी आयोजनकोरे अभियांत्रिकीत सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स शाखेचे उद्घाटनसंस्थांच्या माध्यमातून शेतकरी सभासदांचे हित जपण्याचे काम कौतुकास्पद : अजय पाटील यड्रावकरताणतणावमुक्त जीवन: काळाची गरज आणि आंतरराष्ट्रीय ताणतणाव जागरूकता दिनस्थानिक स्वराज्य संस्था बहुमताने चालायला हव्यात, मोडून काढणे योग्य नव्हे : आमदार सतेज पाटील श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात नवनिर्वाचित शिक्षक आमदार कौस्तुभ गावडे यांचा जाहीर सत्कार!विकसित भारत युवा संवाद कार्यक्रम : प्रशिक्षणार्थींना लोकशाही मुल्यं, मतदान जनजागृती आणि जबाबदार नागरिकत्वाबाबत खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून मार्गदर्शनगोकुळमध्ये दूध उत्पादकांच्या कौलाचा अनादर; लोकशाही वाचवण्यासाठी पत्रकारांनी आवाज उठवावा - आमदार सतेज पाटील यांची साद

जाहिरात

 

उसाच्या दराची कोंडी फोडा, अन्यथा शेतकरी नुकसान सहन करणार नाही! : आमदार सतेज पाटील यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

schedule04 Nov 26 person by visibility 154 categoryराज्य

कोल्हापूर : "स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेतकरी परिषदेच्या माध्यमातून माजी खासदार राजू शेट्टी यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही ऊस दराची मागणी केली आहे. परंतु, राज्य सरकार या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करत असून केवळ एक बैठक घेऊन गप्प बसले आहे. पालकमंत्र्यांनी मुंबईत बसून राहण्यापेक्षा तत्काळ कोल्हापुरात येऊन राजू शेट्टी आणि कारखानदारांशी चर्चा करून तोडगा काढायला हवा," असा घणाघाती घणाघात काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी केला.

पत्रकारांशी संवाद साधताना सतेज पाटील यांनी उसाच्या दराबाबत राज्य सरकारच्या उदासीन धोरणावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली.

◼️"आम्ही पालकमंत्री असताना तोडगा काढायचो"
आपल्या पालकमंत्री पदाच्या काळातील अनुभवाचा उल्लेख करत सतेज पाटील म्हणाले, "मी स्वतः पालकमंत्री असताना दरवर्षी राजू शेट्टी आणि शेतकरी प्रतिनिधींशी प्रामाणिकपणे चर्चा करायचो. कारखानदार आणि शेतकरी या दोघांनाही समोर बसवून मध्यस्थी करायचो, जेणेकरून शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे जास्त पडतील आणि गळीत हंगामही सुरळीत सुरू होईल. परंतु, सध्याचे पालकमंत्री आणि जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी केवळ एक बैठक घेतली आणि त्यानंतर पुढची कोणतीही चर्चा केलेली नाही."

◼️"मुंबईत बसण्यापेक्षा विशेष विमानाने कोल्हापुरात या!"
सरकारच्या भूमिकेवर सडकून टीका करताना ते म्हणाले, "सरकारमधील या पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ या दोन महत्त्वाच्या मंत्र्यांनीराजू शेट्टी यांच्याशी थेट संवाद साधला पाहिजे.

◼️ 'तुम्ही आंदोलन करा, आम्ही लक्ष देणार नाही' ही सरकारची भूमिका अत्यंत चुकीची आहे. सध्या मंत्री महोदय कुठेही जाण्यासाठी चार्टर्ड विमान वापरतात, मग आज कॅबिनेट संपल्यानंतर विशेष विमानाने तत्काळ कोल्हापुरात का येत नाहीत? आजच्या आज दोन्ही बाजूंना समोरासमोर बसवून हा वाद मिटवण्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची आहे."


⬛️"फरकाची रक्कम सरकारने अनुदान म्हणून द्यावी"
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अडचण मांडताना पाटील पुढे म्हणाले, "यंदा उसाचे उत्पादन घटले आहे. केंद्र सरकार साखरेची 'एमएसपी' (न्यूनतम विक्री मूल्य) वाढवून देत नाही. अशा परिस्थितीत जर कारखानदारांची देण्याची क्षमता आणि राजू शेट्टी यांची मागणी यांमध्ये १०० ते २०० रुपयांचा फरक राहत असेल, तर तो फरक राज्य सरकारने अनुदान  म्हणून द्यावा. पंजाबसारखे राज्य जर प्रति टन ५०० रुपये अनुदान देऊ शकते, तर महाराष्ट्र सरकार प्रति टन २०० रुपये अनुदान नक्कीच देऊ शकते."

◼️"उशीर झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान"
"जर ऊस वेळेत तुटला नाही आणि शेतातच राहिला, तर उसाचे वजन घटून शेतकऱ्याचे अपरिमित नुकसान होणार आहे. त्यामुळे सरकारने हा विषय गांभीर्याने घेऊन आज रात्रीपर्यंत कसाही करून तोडगा काढावा आणि साखर कारखाने सुरळीत सुरू करावेत," अशी आक्रमक मागणी आमदार सतेज पाटील यांनी शेवटी केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes