SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे अभिवादन सीपीआर मध्ये यशस्वी व्हेरिकोज वेन्स शस्त्रक्रिया; रुग्णसेवेत महत्त्वपूर्ण पाऊल“फुलेंचा सार्वजनिक सत्यधर्म हा मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा” : प्राचार्य डॉ. जी. पी. माळीकोल्हापुरात १४ एप्रिल रोजी दसरा चौक मैदानावर प्रबोधन महासभेचे आयोजन मतदार यादी पुनरनिरीक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी झोकून काम करावे : आ. सुहास बाबरराधानगरीत रानगव्याच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यूआर्थिक साक्षरता काळाची गरज : डॉ. उदयकुमार शिंदेघोडावत ऑलिम्पियाड स्कूलचे डॉ.होमी भाभा परीक्षेत यशसंघटन सृजन अभियाना अंतर्गत काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यात 13 एप्रिल ते 18 एप्रिल कालावधीत आढावा बैठका होणारडॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये 'भारतीय वायुदलातील करिअर संधी ' विषयावर मार्गदर्शन; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जाहिरात

 

संघटन सृजन अभियाना अंतर्गत काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यात 13 एप्रिल ते 18 एप्रिल कालावधीत आढावा बैठका होणार

schedule11 Apr 26 person by visibility 201 categoryराजकीय

🟣 नवीन पदाधिकारी नेमणुकी संदर्भात काँग्रेस पक्षाच्यावतीने आढावा बैठका घेण्यात येणार

कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तसेच कोल्हापूर शहर आणि  इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटी मध्ये नवीन पदाधिकारी नेमणुकी संदर्भात काँग्रेस पक्षाच्यावतीने आढावा बैठका घेण्यात येणार आहेत. संघटन सृजन अभियाना अंतर्गत या बैठका दिनांक 13 एप्रिल  ते 18 एप्रिल या कालावधीत ज्या त्या तालुक्यात घेण्यात येणार आहेत. या अभियानात काँग्रेसचे सर्व तालुकाध्यक्ष, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह काँग्रेस पक्षासोबत जोडले जाण्याची इच्छा असणाऱ्या सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केले आहे.

अखिल भारतीय काँग्रेस समितीच्यावतीने संघटन सृजन अभियान राबवण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तसेच कोल्हापूर शहर आणि इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटी मध्ये नवीन पदाधिकारी नेमणुकी संदर्भात काँग्रेस पक्षाच्यावतीने आढावा बैठका घेण्यात येणार आहेत. खासदार शाहू महाराज छत्रपती आणि काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठका दिनांक 13 एप्रिल ते 18 एप्रिल या कालावधीत  घेण्यात येणार आहेत.

या आढावा बैठकांना पक्षातर्फे  मुख्य निरीक्षक जय शंकर पाठक यांच्या समवेत कोल्हापूर ग्रामीण साठी सहनिरीक्षक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस  सचिन सावंत ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव नंदकुमार कुंभार, कोल्हापूर शहरसाठी राहुल गायकवाड, चंद्रपूरच्या खासदार  प्रतिभाताई धानोरकर , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव  सुनील मलके आणि राहुल वरदा उपस्थित राहणार आहेत.

या अभियानात काँग्रेसचे सर्व तालुकाध्यक्ष, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह काँग्रेस पक्षासोबत जोडले जाण्याची इच्छा असणाऱ्या सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केले आहे.

  1.  

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes