SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे अभिवादन सीपीआर मध्ये यशस्वी व्हेरिकोज वेन्स शस्त्रक्रिया; रुग्णसेवेत महत्त्वपूर्ण पाऊल“फुलेंचा सार्वजनिक सत्यधर्म हा मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा” : प्राचार्य डॉ. जी. पी. माळीकोल्हापुरात १४ एप्रिल रोजी दसरा चौक मैदानावर प्रबोधन महासभेचे आयोजन मतदार यादी पुनरनिरीक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी झोकून काम करावे : आ. सुहास बाबरराधानगरीत रानगव्याच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यूआर्थिक साक्षरता काळाची गरज : डॉ. उदयकुमार शिंदेघोडावत ऑलिम्पियाड स्कूलचे डॉ.होमी भाभा परीक्षेत यशसंघटन सृजन अभियाना अंतर्गत काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यात 13 एप्रिल ते 18 एप्रिल कालावधीत आढावा बैठका होणारडॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये 'भारतीय वायुदलातील करिअर संधी ' विषयावर मार्गदर्शन; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जाहिरात

 

डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये 'भारतीय वायुदलातील करिअर संधी ' विषयावर मार्गदर्शन; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

schedule11 Apr 26 person by visibility 338 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : " भारतीय वायुदलामध्ये  इंजिनिअर्सना  विविध  तांत्रिक,  अतांत्रिक  आणि  कार्यालयीन पदांच्या  आकर्षक   करिअर संधी  उपलब्ध असून  वर्षभर वायुदलातर्फे विविध  भरती प्रक्रिया  आयोजित केल्या जातात . इंजिनिअर्सचा तंत्रज्ञान  तसेच गणित व भौतिकशास्त्रातील  अभ्यास  उत्तम असल्याने  देशसेवेची संधी देणाऱ्या वायुदलातील  करिअरकडे विद्यार्थ्यांनी वळावे "  असे प्रतिपादन फ्लाईट लेफ्टनंट गुरजीत सिंग बुलार यांनी केले. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे 'भारतीय वायुदलातील करिअर संधी ' या विषयावर त्यांनी सविस्तर  मार्गदर्शन केले. 

इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ . सुहास सपाटे  सपाटे यांनी  प्रास्ताविक केले . फ्लाईट लेफ्टनंट गुरजीत सिंग बुलार यांनी  भारतीय वायुदलाचा गौरवपूर्ण इतिहास , वायुदलाकडून होणारी संरक्षण सेवा  तसेच विविध  मदतकार्ये  , लढाऊ विमाने ,  हेलिकॉप्टर्स यांची माहिती देऊन  त्या अनुषंगाने उपलब्ध  संधींचा ऊहापोह केला . ते म्हणाले , " फ्लाईंग ब्रँचबरोबरच  टेक्निकल ग्राउंड ड्युटी मध्ये  रडार ,मिसाईल,  नेटवर्क,  आयटी,   सायबर सिक्युरिटी अशा विविध  तांत्रिक विभागांसाठी  तसेच  लॉजिस्टिक्ससाठी  मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, एरोस्पेस, एरोनॉटिकल  अशा विविध  इंजिनिअरिंग शाखांमधील  अभियंत्यांची गरज असते.  एनडीए , यूपीएससी, एनसीसी स्पेशल एन्ट्री  तसेच एअर फोर्स  कॉमन ऍडमिशन टेस्ट  या चार  मार्गांद्वारे  वायुदलामध्ये भरती होता येते . इंजिनिअरिंग पदवीमध्ये  किमान 60% गुणप्राप्त विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना वायुदलामध्ये भरती  होता येते . वर्षातून दोन वेळा भारतीय वायुदलातर्फे याविषयीची जाहिरात प्रसिद्ध केली जाते . विद्यार्थ्यांना  एअर फोर्स अकॅडमी आणि एअर फोर्स टेक्निकल कॉलेज येथे प्रशिक्षण दिले जाते . शॉर्ट सर्विस कमिशन तसेच परमनंट कमिशन या दोन्हीमध्ये  गौरवपूर्ण देशसेवा  करून त्यानंतरही विविध संधी उपलब्ध होतात. " विविध परीक्षापद्धती, अभ्यासक्रम,  निवड प्रक्रिया,  वैद्यकीय चाचणी,  विविध पदे,  मिळणारे वेतन व भत्ते , इतर आकर्षक सुविधा यांविषयी त्यांनी विस्तृत माहिती दिली . यावेळी परीक्षेला यशस्वीपणे सामोरे  जाण्यासाठीची आदर्श पद्धती त्यांनी  मांडली .

 विद्यार्थ्यांच्या  उत्स्फूर्त प्रतिसादाने  पार पडलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या  अनेक प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली.  तसेच यावेळी वायुदलामध्ये भरती होण्यासंबंधीच्या माहितीपत्रकांचे वितरण केले . 
संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या  शुभांगी गावडे , संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचे  या कार्यक्रमासाठी  मार्गदर्शन मिळाले.

 संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक  प्राचार्य  विरेन भिर्डी यांनी भारतीय वायुदलाचे आभार मानताना,  विद्यार्थ्यांना  वायुदलामध्ये  सेवा देण्याची सुवर्णसंधी  साधण्याचे आवाहन केले. याप्रसंगी  भारतीय वायुदलाचे कर्मचारी , विभागप्रमुख ,  विद्यार्थी,   शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .  कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. राजेंद्र भोसले  यांनी नियोजन केले.  प्रा. आरती  चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes