SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे अभिवादन सीपीआर मध्ये यशस्वी व्हेरिकोज वेन्स शस्त्रक्रिया; रुग्णसेवेत महत्त्वपूर्ण पाऊल“फुलेंचा सार्वजनिक सत्यधर्म हा मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा” : प्राचार्य डॉ. जी. पी. माळीकोल्हापुरात १४ एप्रिल रोजी दसरा चौक मैदानावर प्रबोधन महासभेचे आयोजन मतदार यादी पुनरनिरीक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी झोकून काम करावे : आ. सुहास बाबरराधानगरीत रानगव्याच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यूआर्थिक साक्षरता काळाची गरज : डॉ. उदयकुमार शिंदेघोडावत ऑलिम्पियाड स्कूलचे डॉ.होमी भाभा परीक्षेत यशसंघटन सृजन अभियाना अंतर्गत काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यात 13 एप्रिल ते 18 एप्रिल कालावधीत आढावा बैठका होणारडॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये 'भारतीय वायुदलातील करिअर संधी ' विषयावर मार्गदर्शन; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जाहिरात

 

कोल्हापुरात १४ एप्रिल रोजी दसरा चौक मैदानावर प्रबोधन महासभेचे आयोजन

schedule11 Apr 26 person by visibility 115 categoryसामाजिक

कोल्हापूर : आंबेडकरी समाज संघटना आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५:०० वाजता ऐतिहासिक दसरा चौक मैदानावर भव्य जनप्रबोधन महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेमध्ये ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत पद्मश्री लक्ष्मण माने, डॉ. अच्युत माने आणि घटनातज्ज्ञ डॉ. सुरेश माने यांचे जाहीर व्याख्यान होणार आहे. 

भारतीय संविधान, समाजकारण, राजकारण आणि धर्मकारण या विषयांवर यावेळी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

या सभेचे उद्घाटन खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी प्रा. शहाजी कांबळे असतील. प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री ना. प्रकाशराव आबीटकर, खासदार धनंजय महाडीक, आमदार सतेज पाटील, आमदार राजेश क्षीरसागर आणि कोल्हापूरच्या महापौर रूपाराणी निकम यांची उपस्थिती राहणार आहे.

 यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. ही सभा यशस्वी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष अनिल धनवडे, कार्याध्यक्ष रूपाताई वायदंडे, सचिव संजय जिरगे यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत. या महासभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes