SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोकुळमार्फत ‘गोकुळ श्री’ स्पर्धेचे आयोजन; जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभाग घ्यावागोकुळ’चा अध्यक्ष निवडण्याचा मार्ग मोकळा; १० नोव्हेंबरला होणार बहुप्रतिक्षित सभा!पालगड येथे वारणा दूध संघाच्या आधुनिक दूध शीतकरण केंद्राचे उद्घाटनसहकार कायद्यातील प्रस्तावित दुरुस्तीवरून 'गोकुळ'मध्ये राजकीय खळबळ!थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लाँचिंग स्टेशनची स्थापना: भारताच्या अंतराळ प्रवासाचा सुवर्णटप्पा!गोकुळ निवडणूक : सरकार शासकीय संचालकांना मताचा अधिकार देणार नाही, दिल्यास आम्ही कोर्टात : आमदार सतेज पाटील"ज्ञानेश कुमार तुरुंगात जाणार, २०२४ ची लोकसभा निवडणूक अवैध!" – दिल्लीच्या रामलीला मैदानावर ‘इंडिया’ आघाडीच्या महारॅलीत राहुल गांधींचा घणाघातसडोली खालसा येथे तीन पानी जुगार अड्ड्यावर करवीर पोलिसांचा छापा; १३ जणांवर कारवाई, ३ लाख ८२ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्तडिजिटल युगात शिक्षणाच्या नव्या संधी : डॉ.ज्योती जाधवविद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर; चिपरी येथे अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन

जाहिरात

 

जाधववाडीतील श्री दत्त मंदिर इमारत नूतनीकरण कामाचा लोकार्पण सोहळा उत्साहात

schedule01 Nov 26 person by visibility 257 categoryसामाजिक

◼️जाधववाडी, कदमवाडी परिसरातील उर्वरित विकासकामेही मार्गी लावणार : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर  : कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २ अंतर्गत जाधववाडी येथील श्री दत्त मंदिर इमारत नूतनीकरण या विकासकामाचा लोकार्पण सोहळा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. या विकासकामासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, “जाधववाडी, कदमवाडी परिसरातील जनता नेहमीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. या भागाच्या विकासासाठी यापुढेही सातत्याने प्रयत्न केले जातील. परिसरातील उर्वरित विकासकामेही टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्यात येतील. नागरिकांना आवश्यक असलेल्या कोणत्याही नागरी सुविधांची वानवा या भागात राहणार नाही,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

श्री दत्त मंदिर हे परिसरातील नागरिकांच्या श्रद्धेचे महत्त्वाचे केंद्र असून, मंदिर इमारतीच्या नूतनीकरणामुळे भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. परिसरातील धार्मिक स्थळांसोबतच मूलभूत नागरी सुविधांच्या विकासालाही प्राधान्य देण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

जाधववाडी-कदमवाडी परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रत्येक कामासाठी पाठपुरावा केला जाईल. नागरिकांच्या अपेक्षा आणि गरजा लक्षात घेऊन विकासकामांना गती देण्यात येईल, असेही आमदार राजेश क्षीरसागर यांनी यावेळी स्पष्ट केले.

◼️पूरनियंत्रण प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर : आमदार राजेश क्षीरसागर

जाधववाडी आणि कदमवाडी परिसरातील नागरिकांना पावसाळ्यात तसेच पूरस्थितीच्या काळात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. पूरपरिस्थितीत या भागातील परिस्थिती अत्यंत बिकट होत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मित्र संस्थेच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या पूरनियंत्रण प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी निधी वितरित करण्यात आला असून, प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले. पूरनियंत्रण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जाधववाडी, कदमवाडी परिसरासह शहरातील पूरप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यास मोठी मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी नगरसेविका प्राजक्ता जाधव, माजी नगरसेवक राजेंद्र कसबेकर, माजी नगरसेवक राजेंद्र डकरे, श्रीमती प्रमिला डकरे, नंदकिशोर डकरे, संजय कसबेकर, श्री शाहू विकास सेवा संस्थेचे चेअरमन विजय मोहिते, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विनय वाणी, विभागप्रमुख यशवंत उर्फ बंडा माने, विभागप्रमुख मुन्ना तोरस्कर, शेतकरी संघटनेचे भगवानराव काटे, शाहू विकास सेवा व श्री दत्त भक्त मंडळ, जाधववाडी परिसरातील नागरिक, पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते, भाविक तसेच स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes