SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज, सतर्क राहण्याचे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळांचे निर्देश8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घटसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांरोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रमप्रा. महेश वासुदेव गावडे यांना पीएच.डी.कोल्हापुरात सामाजिक उपक्रमाचा वस्तुपाठ: ६० गरजू विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटपराजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी: दूध उत्पादक शेतकरी हेच गोकुळचे खरे बापदुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ज्येष्ठांची धाव: आपटेनगर ज्येष्ठ नागरिक संघाकडून रामणवाडीत रेनकोटचे वाटपकोल्हापुरात पावसाचा जोर कायम: वेदगंगा आणि हिरण्यकेशी नद्या इशारा पातळीच्या वररोनाल्डोचे स्वप्न भंगले! स्पेनचा थरारक विजय; पुर्तगाल विश्वचषकातून बाहेरगोडवा अन् आनंदाचा उत्सव: 'जागतिक चॉकलेट दिवस'

जाहिरात

 

8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घट

schedule07 Jul 26 person by visibility 130 categoryशैक्षणिक

मुंबई : जुलै च्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अति वृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये आता पर्यंत सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे, विशेषतः खानदेश (धुळे आणि नंदुरबार जिल्हे), मध्य महाराष्ट्र (अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्हे), पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भाग. 

8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याचा अंदाज असून, ही परिस्थिती किमान पुढील 10 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. या दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे. तसेच, राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्राथमिक अंदाजानुसार जुलै महिन्याच्या दुसऱ्या अर्ध्यात पहिल्या अर्ध्याच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी राहू शकते. 

शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे. ⁠राज्यातील ज्या भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही, तिथे शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes