SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घटसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांरोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रमप्रा. महेश वासुदेव गावडे यांना पीएच.डी.कोल्हापुरात सामाजिक उपक्रमाचा वस्तुपाठ: ६० गरजू विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटपराजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी: दूध उत्पादक शेतकरी हेच गोकुळचे खरे बापदुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ज्येष्ठांची धाव: आपटेनगर ज्येष्ठ नागरिक संघाकडून रामणवाडीत रेनकोटचे वाटपकोल्हापुरात पावसाचा जोर कायम: वेदगंगा आणि हिरण्यकेशी नद्या इशारा पातळीच्या वररोनाल्डोचे स्वप्न भंगले! स्पेनचा थरारक विजय; पुर्तगाल विश्वचषकातून बाहेरगोडवा अन् आनंदाचा उत्सव: 'जागतिक चॉकलेट दिवस'डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विचारांचा वारसा मोदी सरकारने पुढे नेला; राष्ट्रहितासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सज्ज व्हावे : किरीट सोमय्या

जाहिरात

 

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांरोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

schedule07 Jul 26 person by visibility 120 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग व डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट टर्म कोर्सेस विभागाच्या वतीने भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी संजय घोडावत विद्यापीठाच्या  फुटबॉल मैदान परिसरात विद्यार्थी, प्राध्यापक, गार्डन विभागाचे प्रमुख  तात्या देसाई आणि त्यांची टीम यांच्या सहकार्याने ३०० हून अधिक देशी वृक्षांचे रोपण  करण्यात आले. भविष्यात हरित, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त परिसर घडविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम उत्साहात पार पडला.

यावेळी  डॉ. विराट गिरी बोलताना म्हणाले, "पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणाबरोबरच त्यांचे संवर्धन करणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आणि प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा. हीच भावी पिढीला दिलेली सर्वात मौल्यवान भेट ठरेल."

या उपक्रमाचे आयोजक  प्रा. अजय कोंगे, इन्स्टिट्यूटच्या सर्व विभागाचे विभाग प्रमुख  प्रा. सागर चव्हाण, प्रा.रईसा मुल्ला, प्रा. वंदना शहा, प्रा. नितीन पाटील, प्रा. प्रशांत पाटील, प्रा. स्वप्निल थिकने, प्रा. धीरज पाटील, प्रा. रणजीत शिरोडकर, प्रा. प्रतीक आवटी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

पर्यावरण संरक्षण, सामाजिक उत्तरदायित्व आणि हरित भारताच्या निर्मितीसाठी संजय घोडावत इन्स्टिट्यूटने राबविलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणारा आणि समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे. या सामाजिक उपक्रमास संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes