प्रा. महेश वासुदेव गावडे यांना पीएच.डी.
schedule07 Jul 26 person by visibility 124 categoryराज्य
कोल्हापूर : तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंगचे संशोधक प्रा महेश वासुदेव गावडे यांनी 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर प्रायसिंग इन ई-कॉमर्स विथ रिस्पेक्ट टू मार्केट ट्रेण्ड्स' या विषयावर यशस्वी संशोधन पूर्ण केले असून विद्यापिठाकडून त्याना पीएच.डी. ही पदवी जाहीर झाली आहे.
या संशोधनात ई-कॉमर्स क्षेत्रातील किंमत निर्धारण प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रांचा वापर करून बाजारातील ट्रेंड्सचा अभ्यास करण्यात आला. डी. वाय. पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापिठाचे अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. जयदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे संशोधन केले.
कुलपती डॉ. संजय पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, प्र-कुलपती ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू प्रा. डॉ. ए. के. गुप्ता, कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र खोत, अधिष्ठाता डॉ. संग्राम पाटील, टेक्निकल कॅम्पसचे डायरेक्टर डॉ. एस आर पावसकर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले .