SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अर्जेंटिनाचा 'महा-चमत्कार': २-० ने पिछाडीवर असूनही इजिप्तचा केला धुव्वा; थरारक विजयासह क्वार्टरफायनलमध्ये धडक!संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज, सतर्क राहण्याचे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळांचे निर्देश8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घटसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांरोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रमप्रा. महेश वासुदेव गावडे यांना पीएच.डी.कोल्हापुरात सामाजिक उपक्रमाचा वस्तुपाठ: ६० गरजू विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटपराजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी: दूध उत्पादक शेतकरी हेच गोकुळचे खरे बापदुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ज्येष्ठांची धाव: आपटेनगर ज्येष्ठ नागरिक संघाकडून रामणवाडीत रेनकोटचे वाटपकोल्हापुरात पावसाचा जोर कायम: वेदगंगा आणि हिरण्यकेशी नद्या इशारा पातळीच्या वररोनाल्डोचे स्वप्न भंगले! स्पेनचा थरारक विजय; पुर्तगाल विश्वचषकातून बाहेर

जाहिरात

 

संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज, सतर्क राहण्याचे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळांचे निर्देश

schedule07 Jul 26 person by visibility 72 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर शहर व जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थिती व नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस सतर्क राहून कामकाज करावे असे निर्देश अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी दिले. महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

   यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळांनी बोलताना पंचगंगा नदीची पाणीपातळी सातत्याने वाढत असून ती इशारा पातळीच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे सर्व विभागांनी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने दक्ष राहून कामे करावीत. मागील काही दिवसांत वादळी वाऱ्यामुळे पडलेली धोकादायक झाडे हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून जीर्ण व पडण्याच्या स्थितीतील इमारतींवरही आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे. सहाय्यक आयुक्त आणि उपशहर अभियंत्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात नियमित पाहणी करून धोकादायक झाडे व इमारतींची तत्काळ नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करावी असेही त्यांनी सांगितले. रात्रीच्या वेळी विभागीय कार्यालयांतील यंत्रणा सतर्क ठेवण्यासह जेसीबी, ट्रॅक्टर-ट्रॉली, डंपर व इतर आवश्यक यंत्रसामग्री सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच रस्त्यावरील खड्डे, चेंबर्स, गटारांवरील झाकणे यांची पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत. आपत्ती व्यवस्थापनासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचेही अतिरिक्त आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. अग्निशमन विभागाने अतिरिक्त बूम स्वतंत्र त्यांच्यासाठी उपलब्ध करुन घ्यावा. तसेच सर्व सहाय्यक आयुक्त, उपशहर अभियंते आणि विभागीय यंत्रणांनी लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून प्रभावीपणे काम करावे असे निर्देशही बैठकीत देण्यात आले.

यावेळी अतिरिक्त आयुक्‍त शिल्पा दरेकर, उप-आयुक्त परितोष कंकाळ, सहाय्यक आयुक्त उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, डॉ.विजय पाटील, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, लेखा व वित्त अधिकारी राजश्री पाटील, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, उपशहर अभियंता महादेव फुलारी, निवास पोवार, अरुणकुमार गवळी, कर निर्धारण व संग्राहक सुधाकर चल्लावाड, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, रवका अधिकारी प्रशांत पंडत, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंह रजपूत, इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, कनिष्ठ अभियंता पदमल पाटील उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes