SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर: ताराबाई पार्कमध्ये झाड कोसळले; सहा गाड्यांचे नुकसान, एक जखमीएसआयआर अभियान राष्ट्रहितासाठी अत्यंत महत्त्वाचे; प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय सहभाग घ्यावा : भगवानदास सबनानीडॉक्टर्स डे निमित्त कोल्हापुरात आरोग्यदायी उपक्रम: 'भाजप' आणि 'भागीरथी'च्या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!गोकुळसाठी राष्ट्रवादीकडून अखेरच्या मूदतीपर्यंत एकूण १९७६ ठराव दाखलडॉ. संजय डी. पाटील यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार प्रदानशिवाजी विद्यापीठात वसंतराव नाईक यांची जयंतीपंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरूपुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनाडीकेटीईच्या दोन विद्यार्थ्यांची झेन्सार कंपनीत वार्षिक १० लाख पॅकेजवरती निवड​"अभिवादन हरितक्रांतीच्या प्रणेत्यांना.....!"

जाहिरात

 

कोल्हापूर हादरले: भोगावतीत बेकायदेशीर गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश; ४ जणांना अटक

schedule01 Jul 26 person by visibility 548 categoryगुन्हे

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात एका धक्कादायक प्रकाराचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला आहे. भोगावती साखर कारखाना परिसरात बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या टोळीला रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून सोनोग्राफी मशीन आणि गर्भपाताच्या गोळ्यांसह सुमारे ९ लाख ८१ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जिल्ह्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचण्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने सापळा रचला होता. ३० जून रोजी मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, भोगावती येथे गर्भलिंग निदान चाचणी केली जात असल्याचे समोर आले.

या कारवाईसाठी पोलीस पथकाने एक बनावट गर्भवती महिला गिऱ्हाईक म्हणून पाठवली होती. संबंधित आरोपींनी तपासणीसाठी २० हजार आणि गर्भपातासाठी १५ हजार रुपयांची मागणी केली. पैसे देण्याची तयारी दर्शवल्यानंतर, पोलिसांनी भोगावती साखर कारखाना कॉलनीतील एका खोलीवर छापा टाकून ही कारवाई पूर्ण केली.

या कारवाईत पोलिसांनी महेश सुबराव पाटील (वय ३५, रा. शिरसे), अनिल प्रकाश टिपुगडे (वय ५०, रा. भोगावती), सुनिल प्रकाश पाटील (वय ३८, रा. शिरसे) आणि श्रीमंत तानाजी पाटील (वय ३७, रा. परिते) या चौघांना ताब्यात घेतले आहे. या सर्वांवर करवीर पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
या धडाकेबाज कामगिरीत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह वैद्यकीय अधीक्षक डॉ. मृणालिनी पाटील (फाळके), तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने, डॉ. धनंजय पाटील, पीसीपीएनडीटी कायदा सल्लागार अँड. गौरी पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते किरण गवळी व गिता हसुरकर यांचा मोलाचा सहभाग होता.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes