अक्कलकोट येथे प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा पन्हाळगडावर निषेध
schedule16 Jul 25 person by visibility 209 categoryसामाजिक

पन्हाळा (शहाबाज मुजावर) : सोलापूर अक्कलकोट या ठिकाणी एका कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्ष गेले असता. त्यांच्यावर दिपक काटे याने काळे वंगण असणारे अंगावर टाकून तोंडाला काळी फासले, जीवे मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आली, याचाच निषेध आज पन्हाळगड वरील राम मंदिर बस स्थानक या ठिकाणी पन्हाळातील जिजाऊ ब्रिगेड, सर्व पन्हाळा समस्त नागरिक यांच्या वतीने नोंदवण्यात आला. तसेच यावेळी पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक ॲड, रवींद्र तौरसै यांनी सांगितले की ,विचाराची लढाई विचाराने लढली पाहिजे, त्यांनी कधीही प्रक्षोभन भाषण केले नाही, कोणत्याही समाजाच्या भावना दुःखावतील , असे वक्तव्य केले नाही. तरीसुद्धा त्यांच्यावर अशा प्रकारे हल्ला होणे. एक दुर्दैवाची भाव आहे. जरी तो कोणताही पक्षाचा असला तरी त्या इसमावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे.मग तो कोणताही पक्षाचा असो कायदा जर त्याने हातात घेतला, तर त्याला कडक शासन झालेच पाहिजे, कारण त्याने शाही फेकून निषेध व्यक्त केलेलं नाही.त्यांनी काळ वंगण टाकून जीवघेणा हल्ला केला आहे. अशी वृत्ती शासनाने मोडून काढली पाहिजे.
तसेच जिजाऊ ब्रिगेड पन्हाळा अध्यक्ष, मधुरा कुराडे यांनी सांगितले की, संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर नुकताच प्राणघातक हल्ला करणेत आला. या घटनेचा जाहीर निषेध, तर बहुजन विचारावर हल्ला आहे. प्रवीण गायकवाड हे एक संघर्षशील, कणखर आणि बहुजन समाजाच्या हक्कासाठी आवाज उठवणारे नेतृत्व आहे. त्यांच्यावर झालेला भ्याड हल्ला हा केवळ एखाद्या व्यक्तीवरचा नाही, तर तो बहुजन समाजाच्या विचारसरणीवर, सामाजिक मूल्यांवर झालेला गंभीर आधात आहे. तसेच हल्लेखोरांना काय कायद्याचा धाक राहिला आहे. का ? नाही अशी परिस्थिती आज निर्माण होत आहे. तसेच लवकरात लवकर शासनाने यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. आम्ही पन्हाळावासिय प्रवीणदादा यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.
जिजाऊ ब्रिगेड पन्हाळा अध्यक्ष शरयू लाड, जिजाऊ ब्रिगेड महिला अध्यक्ष , मधुरा कुराडे, माजी नगराध्यक्ष रूपाली धडेल, माजी नगरसेविका तेजस्विनी गुरव,, दिपा काशीद, सुरेखा गोसावी ,सुरेखा भोसले, गीता लंबे, रेखा भोसले, सरिता दळवी, आरती कुराडे, तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या पन्हाळागडावरच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष भीमराव काशीद, रामानंद गोसावी, राजू नगारजी, सोपान गोसावी, ॲड,रवींद्र तोरसे, चंद्रकांत गवंडी, मारुती माने, मिलिंद गुळवणी,मंदार नायकवडी, दिपक अबिलडोक ज्येष्ठ पत्रकार ,नितीन भगवान, राजू दळवी, शहाबाज मुजावर पन्हाळागडावरील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.