प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल कोल्हापूरमध्ये 'इको क्लब'चे उद्घाटन
schedule16 Jul 25 person by visibility 216 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल कोल्हापूरमध्ये मंगळवारी इको क्लबचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमा करिता इयत्ता 9 वी क या वर्गाची निवड करण्यात आली. मान्यवरांना रोप भेट म्हणून देण्यात आले .
इको क्लब प्रमुख एम.एम.भा़डवले , संस्कृती शशिकांत पाटील ही प्रमुख तर संजीवनी प्रकाश वरपे उपप्रमुख म्हणून यांची निवड झाली. अपेक्षा सकटे , श्रुती कोळी या मुलींनी मनोगत व्यक्त केले.
एस.एस.पोवार यांनी मनोगतात पर्यावरण संरक्षण काळाची गरज आहे.याचे महत्व मुलींना सांगितले. मुख्याध्यापिका एस.आर.पाटील यांनी मनोगतात पर्यावरणचा विनाश थांबवणे खूप आवश्यक आहे, हे विविध बातम्यांचा संदर्भ देऊन मुलींना पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी प्रेरणा दिली.मान्यवरांच्या हस्ते रोप लावण्यात आले.संगीत विभागाने,' रोप लावु या ' हे गीत सादर केले.
कार्यक्रमास मुख्याध्यापिका एस.आर.पाटील, उपमुख्याध्यापक आर. जी.देशपांडे, पर्यवेक्षक ए. डी.भोई , एस.एस.इनामदार, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन व आभार एम.एम.भांडवले यांनी मानले.