कोरे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठात निवड
schedule16 Jul 25 person by visibility 303 categoryशैक्षणिक

वारणानगर : तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनोमस) मधील दोन विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर घवघवीत यश संपादन केले असून त्यांचा महाराष्ट्र शासनाच्या परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सिडनी विद्यापीठ ऑस्ट्रेलिया (जगातील १८ वा क्रमांकाचे विद्यापीठ) येथे एम एस अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला आहे.
मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचा ओंकार श्रावस्ती याला ९५ लाख रुपयांचे शिष्यवृत्ती तर कम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग विभागातील कुमारी प्रतीक्षा कांबळे हिला ९१ लाख रुपयांचे शिष्यवृत्ती महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झाली आहे.
या दोघांचेही अभिनंदन व सत्कार श्री वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे व श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. विलास. व्ही. कारजिन्नी यांनी केले. त्यांच्या यशामागे महालक्ष्मी अकॅडमी कोल्हापूर यांचे प्रभावी मार्गदर्शन मोलाचे ठरले.
प्र. प्राचार्य, डॉ. डी. एन. माने, अधिष्ठाता, डॉ. एस. पिसे यांनी दोघांचे हार्दिक अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मेकॅनिकल विभाग प्रमुख, डॉ. पी. व्ही. मुळीक व कम्प्युटर सायन्स इंजीनियरिंग विभाग प्रमुख, डॉ. आर. बी. पाटील व या दोन्ही विभागातील सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
या गौरवामुळे कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता व मार्गदर्शन पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. महाराष्ट्र शासनाचे ही शिष्यवृत्ती योजना राज्यातील होतकरू विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणारे ठरत आहे.