SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
प्रार्थना संगीत ही जीवन उन्नतीची दिशा: कैशवचैतन्य कुंटेविनापरवाना व्यवसायांवर महापालिकेची कारवाई; ५१ व्यवसायधारकांना नोटिसा; ३ लाख १० हजारांची थकबाकी वसूलगोकुळ दूध संघ निवडणूक: महायुतीच्या 'छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी'चे पॅनेल जाहीर; दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत घडामोडींना वेगगोकुळ दूध संघ निवडणुकीत 'राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी'च्या पॅनलची घोषणा दणदणीत जाहीरनामा जाहीर; दूध उत्पादकांसाठी सवलतींचा वर्षाव!सायबर जनजागृती महिन्यानिमित्त कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने डिजिटल सायबर चित्ररथाचे उ‌द्घाटनग्रामीण भागातील अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करण्यासाठी नागरिकांचा प्रतिसादहेरवाड, शिरदवाड आरोग्य उपकेंद्रांना राष्ट्रीय NQAS मानांकननटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; अभिनय, संवेदनशीलतेचा भारदस्त चेहरा काळाच्या पडद्याआडज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन; चित्रपटसृष्टीत शोककळाभारतीय हवाई दल दिन: शौर्य, पराक्रम आणि देशसेवेचे प्रतीक

जाहिरात

 

प्रार्थना संगीत ही जीवन उन्नतीची दिशा: कैशवचैतन्य कुंटे

schedule08 Oct 26 person by visibility 153 categoryसामाजिक

कोल्हापूर : प्रार्थना संगीत ही जीवन उन्नतीची दिशा आहे, असे प्रतिपादन संगीताचार्य प्रा. केशवचैतन्य कुंटे यांनी केले. ते शिवाजी विद्यापीठातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनाच्या वतीने ‘प्रार्थना संगीत’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. नंदकुमार मोरे होते.

प्रा. कुंटे म्हणाले, माणसा-माणसांतील परस्परसंबंध प्रार्थनेतून सांधले जातात. प्रार्थना या संगीताचा पाया आहेत. कर्णमधुरता व उत्कट भावनाशील अभिव्यक्ती ही प्रार्थनेत महत्त्वपूर्ण ठरते. जीवनाकडे सकारात्मकपणे पाहण्याची दृष्टी प्रार्थनेमुळे येते. परस्पर प्रीती, पूज्यताबुद्धीत वाढ होते. सर्व मनुष्ये सारखी असल्याचा भाव प्रार्थनेतून व्यक्त होतो. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी हे प्रार्थना समाजाच्या माध्यमातून साधले. करुणेच्या किरणांनी भरलेले जग त्यांनी याद्वारे स्वीकारले.

डॉ. नंदकुमार मोरे अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, मुळात माणूस हा प्राणी भटका होता. त्यामुळे संस्कृती संयोगातून अनेक गोष्टींची देवाणघेवाण झाली. प्रार्थना संगीत हे त्याचेच प्रगत रूप होय. प्रार्थना ही मानवी सद्‌भावाचा झरा अखंडित ठेवणारी, चैतन्यदायी ताकद असते. तिच्यामुळे अंत:शुद्ध चैतन्य गवसते.

मराठी अधिविभागप्रमुख व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनाचे समन्वयक डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. संगीताचार्य पंडित सुधीर पोटे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अनिता मिस्कूळ यांनी सूत्रसंचालन केले. स्नेहल तावडे यांनी आभार  मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes