SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
प्रार्थना संगीत ही जीवन उन्नतीची दिशा: कैशवचैतन्य कुंटेविनापरवाना व्यवसायांवर महापालिकेची कारवाई; ५१ व्यवसायधारकांना नोटिसा; ३ लाख १० हजारांची थकबाकी वसूलगोकुळ दूध संघ निवडणूक: महायुतीच्या 'छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी'चे पॅनेल जाहीर; दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत घडामोडींना वेगगोकुळ दूध संघ निवडणुकीत 'राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी'च्या पॅनलची घोषणा दणदणीत जाहीरनामा जाहीर; दूध उत्पादकांसाठी सवलतींचा वर्षाव!सायबर जनजागृती महिन्यानिमित्त कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने डिजिटल सायबर चित्ररथाचे उ‌द्घाटनग्रामीण भागातील अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करण्यासाठी नागरिकांचा प्रतिसादहेरवाड, शिरदवाड आरोग्य उपकेंद्रांना राष्ट्रीय NQAS मानांकननटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; अभिनय, संवेदनशीलतेचा भारदस्त चेहरा काळाच्या पडद्याआडज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन; चित्रपटसृष्टीत शोककळाभारतीय हवाई दल दिन: शौर्य, पराक्रम आणि देशसेवेचे प्रतीक

जाहिरात

 

गोकुळ दूध संघ निवडणूक: महायुतीच्या 'छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी'चे पॅनेल जाहीर; दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत घडामोडींना वेग

schedule08 Oct 26 person by visibility 370 categoryराजकीय

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी महायुतीच्या वतीने 'छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी' ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली असून, निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे.
या निवडणुकीच्या माध्यमातून महायुतीने (राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गट, भारतीय जनता पार्टी, शिवसेना-शिंदे गट आणि जन सुराज्य शक्ती पक्ष) एकत्रितपणे गोकुळ निवडणुकीत आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कंबर कसली आहे.

प्रमुख नेत्यांची उपस्थिती
घोषणा प्रसंगी महायुतीचे सर्व प्रमुख नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजयबाबा घाटगे, माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, संजय पाटील-यड्रावकर, बाळासाहेब खाडे, शिवाजीराव पाटील, राजवर्धन नाईक निंबाळकर, आप्पासाहेब नलवडे, प्रकाशभाई पताडे आणि प्रा. शेखर देसाई तसेच सर्व उमेदवार आदी मान्यवरांचा समावेश होता.

🌑  'छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी' ची अधिकृत पॅनेल जाहीर :
 ◼️* राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट):
   माजी आमदार राजेश नरसिंगराव पाटील (चंदगड), अरुणराव गणपतराव डोंगळे (राधानगरी), राहुल पांडुरंग उर्फ पी. एन. पाटील (करवीर), रणजित कृष्णराव उर्फ के. पी. पाटील (भुदरगड), युवराज दत्ताजीराव पाटील (कागल), सतीश भीमगोंडा पाटील (गडहिंग्लज), नवीद हसन मुश्रीफ (कागल), अर्चना आनंदराव उर्फ ए. वाय. पाटील (राधानगरी), रणजीत दिलीप पाटील (शिरोळ).

 ◼️* भारतीय जनता पार्टी (भाजप):
   सौ. शौमिका अमल महाडिक (शिरोली), अंबरीशसिंह संजय घाटगे (कागल), चेतन अरुण नरके (पन्हाळा), दीपक भरमू पाटील (चंदगड), अशोक काशिनाथ चराटी (आजरा), प्रतापसिंह शंकरराव पाटील (करवीर), विश्वास शंकर जाधव (पन्हाळा).

 ◼️* शिवसेना (शिंदे गट):
   विश्वास नारायण पाटील - आबाजी (करवीर), अजित शशिकांत नरके (पन्हाळा), संभाजी रंगराव पाटील (करवीर), अजित पांडुरंग पाटील (करवीर), ॲड. वीरेंद्र संजय मंडलिक (कागल), मदन बाबुराव देसाई (भुदरगड), डॉ. सुजित वसंतराव मिणचेकर (हातकणंगले).

◼️ * जन सुराज्य शक्ती पक्ष:
   कर्णसिंह संजयसिंह गायकवाड (शाहूवाडी), अमरसिंह यशवंत पाटील (पन्हाळा).

महायुतीकडून सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र करून तगडे पॅनेल दिल्याने 'गोकुळ'ची ही पंचवार्षिक निवडणूक अतिशय चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes