SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
प्रार्थना संगीत ही जीवन उन्नतीची दिशा: कैशवचैतन्य कुंटेविनापरवाना व्यवसायांवर महापालिकेची कारवाई; ५१ व्यवसायधारकांना नोटिसा; ३ लाख १० हजारांची थकबाकी वसूलगोकुळ दूध संघ निवडणूक: महायुतीच्या 'छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी'चे पॅनेल जाहीर; दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत घडामोडींना वेगगोकुळ दूध संघ निवडणुकीत 'राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी'च्या पॅनलची घोषणा दणदणीत जाहीरनामा जाहीर; दूध उत्पादकांसाठी सवलतींचा वर्षाव!सायबर जनजागृती महिन्यानिमित्त कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने डिजिटल सायबर चित्ररथाचे उ‌द्घाटनग्रामीण भागातील अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करण्यासाठी नागरिकांचा प्रतिसादहेरवाड, शिरदवाड आरोग्य उपकेंद्रांना राष्ट्रीय NQAS मानांकननटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; अभिनय, संवेदनशीलतेचा भारदस्त चेहरा काळाच्या पडद्याआडज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन; चित्रपटसृष्टीत शोककळाभारतीय हवाई दल दिन: शौर्य, पराक्रम आणि देशसेवेचे प्रतीक

जाहिरात

 

हेरवाड, शिरदवाड आरोग्य उपकेंद्रांना राष्ट्रीय NQAS मानांकन

schedule08 Oct 26 person by visibility 161 categoryआरोग्य

◼️कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली दोन उपकेंद्रे; आमदार यड्रावकर यांनी मानले आरोग्य केंद्रांचे आभार 

शिरोळ : शिरोळ तालुक्यातील हेरवाड आणि शिरदवाड येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानक (NQAS) मानांकन प्राप्त झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय स्तरावरील NQAS मानांकनासाठी पात्र ठरणारी पहिली दोन आरोग्य उपकेंद्रे ठरण्याचा बहुमान शिरोळ तालुक्याला मिळाला आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणेच्या गुणवत्तेची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच हेरवाड व शिरदवाड ग्रामस्थांचे अभिनंदन केले आहे.

राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन प्रक्रियेत आरोग्य सेवा, व्यवस्थापन, स्वच्छता, औषधांची उपलब्धता, रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा, माता-बाल संगोपन, प्राथमिक उपचार आणि विविध आरोग्यविषयक निकषांची तपासणी केली जाते. या निकषांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत हेरवाड व शिरदवाड उपकेंद्रांनी हे मानांकन प्राप्त केले.

हेरवाड उपकेंद्राने उत्तम व्यवस्थापन आणि लोकसहभागाच्या माध्यमातून आरोग्याचा आदर्श पॅटर्न राबविला आहे. नागरिकांना दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासोबतच लोकसहभागातून आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात आले. तर शिरदवाड उपकेंद्राने माता-बाल संगोपन आणि प्राथमिक उपचारांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत राष्ट्रीय मानांकन मिळविले.

या कामगिरीमागे शिरोळ तालुक्यातील आरोग्य यंत्रणेला मिळालेले मार्गदर्शन आणि पाठबळ महत्त्वाचे ठरले आहे. आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला असून, आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी आवश्यक सहकार्य व प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून तसेच आरोग्य विभागातील अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या सहभागातून हे यश साध्य झाले आहे.

या कामगिरीत तालुका आरोग्य अधिकारी पांडुरंग खटावकर यांचेही महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. NQAS मानांकनासाठी आवश्यक बाबींची पूर्तता, आरोग्य सेवांचा दर्जा आणि विविध निकषांनुसार कामकाज करण्यासाठी आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नांना यामुळे यश मिळाले.

हेरवाड व शिरदवाड उपकेंद्रांना मिळालेले राष्ट्रीय NQAS मानांकन हा शिरोळ तालुक्याच्या ग्रामीण आरोग्य व्यवस्थेसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच हेरवाड व शिरदवाड ग्रामस्थांचे अभिनंदन केले आहे. यासाठी हेरवाड व शिरदवाड ग्रामपंचायतचे मोठे सहकार्य लाभले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes