SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर: ताराबाई पार्कमध्ये झाड कोसळले; सहा गाड्यांचे नुकसान, एक जखमीएसआयआर अभियान राष्ट्रहितासाठी अत्यंत महत्त्वाचे; प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय सहभाग घ्यावा : भगवानदास सबनानीडॉक्टर्स डे निमित्त कोल्हापुरात आरोग्यदायी उपक्रम: 'भाजप' आणि 'भागीरथी'च्या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!गोकुळसाठी राष्ट्रवादीकडून अखेरच्या मूदतीपर्यंत एकूण १९७६ ठराव दाखलडॉ. संजय डी. पाटील यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार प्रदानशिवाजी विद्यापीठात वसंतराव नाईक यांची जयंतीपंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरूपुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनाडीकेटीईच्या दोन विद्यार्थ्यांची झेन्सार कंपनीत वार्षिक १० लाख पॅकेजवरती निवड​"अभिवादन हरितक्रांतीच्या प्रणेत्यांना.....!"

जाहिरात

 

केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाला वेग: रंगकर्मींच्या अटी मान्य, कोल्हापूर महापालिकेचा सकारात्मक निर्णय!

schedule30 Jun 26 person by visibility 304 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणी सुकाणू समितीच्या बैठकीनंतर आज महापौर रुपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली रंगकर्मी, हेरिटेज समितीचे प्रतिनिधी, नाट्यकर्मी व विविध कलाकारांची आढावा बैठक पार पडली. बैठकीत रंगकर्मींनी मांडलेल्या सुमारे 90 टक्के मागण्या मान्य करण्यात आल्या असून उर्वरित मागण्या लेखी स्वरूपात सादर करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिल्या. या बैठकीत रंगकर्मींनी नाट्यगृहातील विविध सुविधांबाबत सूचना व मागण्या मांडल्या. यापैकी ज्या बाबींमध्ये तात्काळ दुरुस्ती करणे शक्य आहे, त्या तत्काळ पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन महापौर  रुपाराणी निकम यांनी दिले.

 यावेळी हेरिटेज समितीच्या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या कामाचा आढावा घेण्यात आला. प्रत्यक्ष स्थळावर आवश्यक असलेल्या काही बाबींबाबतच्या मागण्या हेरिटेज समितीच्या अध्यक्षांनी महापौरांकडे सादर केल्या. या बैठकीत आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी येत्या 9 ऑगस्ट 2026 रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे लोकार्पण करण्याच्या दृष्टीने महापालिकेकडून सर्व तयारी सुरू असल्याची माहिती दिली. तसेच लोकार्पणापूर्वी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा व दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

 यावेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, उपसभापती दिपा ठाणेकर, प्रभाग समिती सभापती अनुराधा खेडकर, सभागृह नेता मुरलीधर जाधव, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, गटनेते आदिल फरास, नगरसेवक जयंत पाटील, विजयसिंह खाडे-पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, कनिष्ठ अभियंता सुरेश पाटील, अनुराधा वांडरे, हेरिटेज कमिटीच्या अध्यक्षा अमरजा निंबाळकर, सदस्य प्रशांत हडकर, संदीप दिघे, स्ट्रक्चरल कन्सलटंट चेतन रायकर, राजेश यादव, जगदीश सुतार, गोदरेज ॲण्ड बॉईज कंपनीचे महेश पांचाळ, हर्षद कोगनोळे, रंगकर्मी रोहन घोरपडे, सुनिल घोरपडे, किरणसिंह चव्हाण, नितीन शेनेज, विलास डोळस आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes