SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
बांबवडे येथे 5 जून रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजनकोल्हापुरी चपलेचा डंका सातासमुद्रापार! ‘द कोल्हापुरी’ पुस्तकाला तब्बल ११ जागतिक पुरस्कार; 'ब्लॅक एलिफंट'वरही कोरले नाव!२५० कोटी रुपयांच्या अत्याधुनिक सुविधांचे लोकार्पण ; कोल्हापूरमधील रुग्णसेवेला नवे बळकसबा बावडा परिसरात महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाईजगाच्या कल्याणासाठी मनुष्याने शाश्वत जीवनशैली पुढे घेवून जाणे आवश्यक : सिध्दार्थ शिंदेडी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; ‘इंडिया एलिट एज्युकेशन अवॉर्ड’ ने सन्मानितप्रिन्सेस पद्माराजेच्या पूर्वा केंगलेची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवडजागतिक पचन आरोग्य दिन: निरोगी शरीराची सुरुवात होते मजबूत पचनसंस्थेपासून!तांबट कमान ते तलवार चौक परिसरात महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाईकोल्हापुरात गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक; १.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

जाहिरात

 

प्रिन्सेस पद्माराजेच्या पूर्वा केंगलेची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड

schedule29 May 26 person by visibility 170 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : दि न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, कोल्हापूर येथील पूर्वा प्रभाकर केंगले हिने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड मिळवली आहे. इयत्ता ९ वीच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या निवड प्रक्रियेत तिने उत्कृष्ट कामगिरी करून हे यश प्राप्त केले.

पूर्वा ही अभ्यासू, मेहनती व जिद्दी विद्यार्थिनी असून तिच्या या यशामुळे शाळेच्या नावलौकिकात भर पडली आहे. तिच्या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या यशामागे विद्यार्थिनीची अथक मेहनत, पालकांचे सहकार्य तसेच शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन लाभल्याची भावना व्यक्त करण्यात आली. पूर्वाच्या या यशामुळे शाळेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून इतर विद्यार्थिनींनाही प्रेरणा मिळाली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes