SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विविधतेचा उत्सव: जागतिक एकता साधणारा 'आंतरराष्ट्रीय संस्कृती संवाद दिन'शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चाव्हीएतनाम मध्ये झालेल्या सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता एकोंडीचा पैलवान अक्षय ढेरेचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सन्मानउंचगावमध्ये स्मार्ट मीटर सक्तीला शिवसेनेचा विरोध; स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय काम नको: विक्रम चौगुले यांचा इशाराइंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची बिनविरोध निवडघरफाळा 6 टक्के सवलत योजने अंतर्गत एक दिवसांत 1 कोटी 1 लाख रुपये जमाशिवाजी विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विकास आघाडीचे पाठबळ : डॉ. संजय डी. पाटील यांची ग्वाही; आघाडीच्यावतीने कुलगुरु, प्र-कुलगुरूंचे स्वागत​"शासकीय कंत्राटदारांच्या प्रलंबित समस्यांच्या सोडवणुकीसाठी १४ जून रोजी कोल्हापुरात राज्यस्तरीय महाअधिवेशन"काळाचा ठेवा: 'आंतरराष्ट्रीय अभिलेख दिवस' आणि आपल्या वारशाचे जतनमराठी चित्रपट महामंडळ निवडणूक: मेघराज राजेभोसले यांच्या 'समर्थ पॅनेल'चा दणदणीत विजय

जाहिरात

 

कसबा बावडा परिसरात महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई

schedule29 May 26 person by visibility 287 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्र.4  (छ.ताराराणी मार्केट) व अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून आज कसबा बावडा मेनरोड ते प्रिन्स शिवाजी विद्यालय या परिसरात संयुक्त अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान 7 स्टॅण्डबोर्ड, 1 लोखंडी पाईप, 1 वॉटर कुलर, 1 छपरी, 5 बोर्ड व 1 पार्किंग जाळी जप्त करण्यात आली.

 महानगरपालिकेच्या ठराव क्र. 83, दि. 18 मे 2026 नुसार अतिक्रमण कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेले अनधिकृत साहित्य संबंधित व्यवसायधारकांना परत न देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आज जप्त करण्यात आलेले साहित्य कायमस्वरूपी जप्त करण्यात आले आहे.

   सदरची कारवाई महापौर  रुपाराणी निकम व आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त डॉ.विजय पाटील व शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये उपशहर अभियंता निवास पोवार, कनिष्ठ अभियंता अनुराधा वांढरे, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपीक सजन नागलोत तसेच अतिक्रमण व विभागीय कार्यालय क्र.4 मधील कर्मचाऱ्यांच्या पथकाने सहभाग घेतला.

  महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील अनधिकृत फेरीवाले, व्यवसायधारक तसेच रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत शेड्स व अतिक्रमणांविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार आहे. तरी संबंधितांनी आपले अतिक्रमण त्वरित स्वतःहून हटवावे, अन्यथा जप्त करण्यात आलेले साहित्य परत दिले जाणार नाही असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

तांबट कमान ते तलवार चौक परिसरात महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई

schedule28 May 26 person by visibility 519 categoryमहानगरपालिका

◼️6 डिजीटल बोर्ड, 9 हातगाड्या व 3 केबीन जप्त

कोल्हापूर : शहरातील अतिक्रमणांविरोधात महानगरपालिकेने आज पुन्हा कडक कारवाई करत तांबट कमान ते तलवार चौक परिसरातील अनधिकृत फेरीवाले, डिजिटल बोर्ड व केबिन हटविले. विभागीय कार्यालय क्र. 1 (गांधी मैदान) व अतिक्रमण निर्मूलन पथकाने या मोहिमेत 6 अनधिकृत डिजिटल बोर्ड, 9 हातगाड्या आणि 3 केबिन जप्त करण्यात आले. तर 24 हातगाडीधारकांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढून घेतले. महानगरपालिकेच्या ठराव क्र. 83, दि. 18 मे 2026 नुसार अतिक्रमण कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेले अनधिकृत साहित्य संबंधित व्यवसायधारकांना परत न देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आज जप्त करण्यात आलेले साहित्य कायमस्वरूपी जप्त करण्यात आले आहे.

  ही कारवाई महापौर रुपाराणी निकम व आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त उज्वला शिंदे आणि शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. 

या कारवाईमध्ये उपशहर अभियंता महादेव फुलारी, कनिष्ठ अभियंता अनिरुद्ध कोरडे, चेतन आरमाळ, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपीक सजन नागलोत तसेच अतिक्रमण विभाग व विभागीय कार्यालय क्र. 1 मधील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

 महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील अनधिकृत फेरीवाले, व्यवसायधारक तसेच रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत शेड्स व अतिक्रमणांविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार आहे. तरी संबंधितांनी आपले अतिक्रमण त्वरित स्वतःहून हटवावे, अन्यथा जप्त करण्यात आलेले साहित्य परत दिले जाणार नाही, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes