कोल्हापूर महापालिकेत दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा
schedule21 May 26 person by visibility 59 categoryसामाजिक
कोल्हापूर : दहशतवाद व हिंसाचार विरोध दिनानिमित्त महानगरपालिकेच्यावतीने आज महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापौर रुपाराणी निकम व आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली.
यावेळी आम्ही, भारताचे नागरिक, आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णूतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा आमच्या सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करत आहोत अशी प्रतिज्ञा यावेळी घेतली. वरिष्ठ लिपिक तुषार भरसट यांनी प्रतिज्ञाचे वाचन केले.
यावेळी उप-महापौर अक्षय जरग, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेता इंद्रजित बोंद्रे, उप-आयुक्त परितोष कंकाळ, सहा.आयुक्त स्वाती दुधाणे, वित्तलेखा अधिकारी राजश्री पाटील, नगरसेवक विनय फाळके, संजय मोहिते, प्रतापसिंह जाधव, अमर समर्थ, वैभव माने, प्रविण सोनवणे, विशाल चव्हाण, सचिन शेंडे, नगरसेविका जयश्री चव्हाण, पुर्वा राणे, सृष्टी जाधव, अरुणा गवळी, स्वाती यवलूजे, स्वाती कांबळे, दिपाली घाटगे, अरुराधा मुळीक, अर्चना बिरांजे, मानसी लोळगे, जयश्री कांबळे, रवका अधिकारी प्रशांत पंडत, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.