कोल्हापूर जिल्ह्यातील लहान मुलांसाठी 31 मे रोजी मोफत हृदय तपासणी, शस्त्रक्रिया शिबिर
schedule21 May 26 person by visibility 170 categoryआरोग्य
कोल्हापूर : गेली अनेक वर्षे विविध आरोग्य शिबिराचे आयोजन शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मार्फत केले जात असून राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 62 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रविवारी, 31 मे रोजी एका विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आजपर्यंत अशा शिबिरातून 10,000 पेक्षा जास्त बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील लहान मुलांसाठी (0ते18 वयोगट) मोफत 2डी इको (2D Echo) तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले असून, गरजू रुग्णांना याचा लाभ घेण्याचे आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रशांत साळुंखे यांनी केले आहे.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, ज्युपिटर हॉस्पिटल-पुणे आरोग्यदूत फाऊंडेशन आणि शिवसेना कोल्हापूर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने हे भव्य शिबिर पार पडणार आहे. सदर शिबिर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षचे प्रमुख मंगेश चिवटे आणि कार्याध्यक्ष रामहरी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. सदर शिबिरासाठी प्रमुख तज्ज्ञ डॉ. राहुल सराफ (Coneultant Pediatric Cardiologist), डॉ. अभिजित नाईक (Consultant Pediatric Cardiac Surgeon) उपस्थित राहणार आहेत. हृदयरोग असलेल्या बालकांसाठी हे एक महत्त्वपूर्ण शिबिर असून जास्तीत जास्त जणांपर्यंत माहिती पोहोचवून लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशांत साळुंखे यांनी केले आहे.
मोफत आरोग्य शिबिर सेवा रुग्णालय, कसबा बावडा, कोल्हापूर येथे सकाळी १०:०० ते दुपारी ४:०० वाजेपर्यंत असणार आहे. या 2डी इको शिबिरामध्ये ज्या बालकांसाठी पुढे शस्त्रक्रिया करायच्या आहेत, त्यांची मोफत शस्त्रक्रिया जुपिटर हॉस्पिटल, पुणे या ठिकाणी मोफत होतील.
संपर्क :
गणेश बोऱ्हाडे,
समन्वयक,
ज्युपिटर हॉस्पिटल, पुणे.
9579088787
मनमोहन खोत
कोल्हापूर उप जिल्हा प्रमुख,
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष
9503402203
विनायक जाधव
कोल्हापूर शहर प्रमुख,
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष
9552075993
प्रशांत पाटील
कोल्हापूर शहर संघटक,
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष
8888347174
अनिल सावंत
कोल्हापूर उप शहर प्रमुख,
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष
9284416393