SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
खरीप हंगाम 2025 पीकस्पर्धा निकाल जाहीर; राज्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अव्वल क्रमांकमातृत्व ग्रुप आयोजित रक्तदान, मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरास कोल्हापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० हून अधिक नागरिकांनी घेतला लाभकोल्हापूर महापालिकेत दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञासार्जंट शौर्या अश्वीन शिंदेला बेस्ट कॅडेट अवॉर्डकोल्हापूर जिल्ह्यातील लहान मुलांसाठी 31 मे रोजी मोफत हृदय तपासणी, शस्त्रक्रिया शिबिरडिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेसाठी डॉ. बापूजी साळुंखे पॉलिटेक्निकमध्ये शासनमान्य सुविधा केंद्रअमृततुल्य चहा: संस्कृती, संवाद आणि आदर!एनसीसी भवनमध्ये प्रशिक्षण शिबिर संपन्नमान्सूनपूर्व तयारीचा आढावा: जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडून हातकणंगले, शिरोळ आणि कुरुंदवाड परिसराची प्रत्यक्ष पाहणीराधानगरी येथील शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश नोंदणी सुरू

जाहिरात

 

मातृत्व ग्रुप आयोजित रक्तदान, मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरास कोल्हापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० हून अधिक नागरिकांनी घेतला लाभ

schedule21 May 26 person by visibility 91 categoryआरोग्य

कोल्हापूर: 'तुमच्या रक्ताची एक पिशवी, कोणाचे तरी आयुष्य उजळवू शकते' हा उदात्त संदेश देत मातृत्व ग्रुप, कोल्हापूर यांच्या पुढाकाराने एक भव्य सामाजिक उपक्रम नुकताच पार पडला. कै. जयदीप जयराम देवरुखकर व कै. मधुकर केशव घारे यांच्या स्मरणार्थ, मातृत्व ग्रुप, श्री सिद्धीविनायक हार्ट हॉस्पिटल, वाय.एस.पी.एम.एम. अर्पण रक्तपेढी व नंदादीप आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंगमध्ये भव्य रक्तदान, मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

 या शिबिराचे उद्घाटन डॉ.  राजेंद्र चिंचणीकर, डॉ. मगदूम व डॉ. मोहिते तसेच घारे बंधू आणि दैवज्ञ बोर्डिंगचे सेक्रेटरी  मधुकर पेडणेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. याप्रसंगी उपाध्यक्ष मुरलीधर मसरूकर,  रत्नाकर कारेकर, वनिता समाज अध्यक्षा अपूर्वा चोडणकर व  वृषाली घारे यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिराला परिसरातील नागरिकांकडून प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिरादरम्यान सामाजिक बांधिलकी जपत ५५ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले आणि गोळा झालेले रक्त अर्पण रक्तपेढीकडे सुपूर्द करण्यात आले. यासोबतच अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने ३०० हून अधिक रुग्णांची मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात आला. यामध्ये हृदय व सामान्य आरोग्य तपासणी अंतर्गत एकूण १५० नागरिकांची ब्लड शुगर (मधुमेह), ईसीजी आणि बीपी (ब्लड प्रेशर) तपासणी करण्यात आली. तसेच नंदादीप आय हॉस्पिटलच्या वतीने १५० लोकांची स्वयंचलित दृष्टी तपासणी व दृष्टी चार्ट चाचणी करून अचूक दृष्टी नंबर देण्यात आले आणि मोफत औषधोपचार करण्यात आला. शिबिरात प्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत (सी.टी.) पाटील आणि डॉ. राजेंद्र चिंचणीकर यांनी उपस्थित रुग्णांना बहुमोल वैद्यकीय मार्गदर्शन केले.

या यशस्वी शिबिराचे आयोजन वृषाली व विजयकुमार मधुकर घारे,  विशाल विजय घारे व विवेक विजय घारे यांनी केले होते. या सामाजिक उपक्रमासाठी अमोल गायकवाड, प्रवीण चोडणकर, सागर चिंचणेकर, विवेक खेडेकर, सचिन व जीवन चोडणकर व समस्त घारे परिवार यांचे बहुमोल सहकार्य लाभले. या कार्यक्रमास दैवज्ञ शिक्षण समाज (बोर्डिंग) चे सर्व पदाधिकारी, संचालक, विश्वस्त, तसेच दैवज्ञ वनिता समाज व युवा मंच यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याबद्दल घारे परिवारातर्फे सर्वांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes