SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
के.एस.बी.पी. पार्क परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाईसामाजिक न्याय विभागाकडून लाभार्थ्यांना साहित्य वाटपसीएसआरद्वारे शहर विकासासाठी बँकर्सनी साथ द्यावी : आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांचे आवाहनडी. वाय. पाटील आर्किटेक्चर विद्यार्थ्यांच्या डिझाइन्सचे बुधवारपासून प्रदर्शनकोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात युरेका-जिज्ञासाचे आयोजन; राष्ट्रीय स्तरावरील शोध निबंध, प्रोजेक्ट व प्रेझेंटेशन स्पर्धानुतन आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडून विविध प्रकल्पांची पाहणीकोल्हापुरातील अनधिकृत बांधकामे अतिक्रमणांबाबत कोल्हापूर नेक्स्टचे महापौर यांना निवेदनपदवीधर मतदार संघावर महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हावे : आमदार राजेश क्षीरसागरकोल्हापुरात महापालिकेविरोधात 'बोंबमारो'चा कडकडाट; अमृत २.० च्या रखडलेल्या कामावरून भारतीय दलित महासंघ रस्त्यावरसाहित्यसम्राट बंकिमचंद्र चटर्जी: ज्यांच्या शब्दांतून 'वंदे मातरम' घुमले

जाहिरात

 

डी. वाय. पाटील आर्किटेक्चर विद्यार्थ्यांच्या डिझाइन्सचे बुधवारपासून प्रदर्शन

schedule09 Apr 26 person by visibility 152 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  : कसबा बावडा  येथील डी.  वाय.  पाटील  स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी बनवलेली विविध आर्किटेक्चर डिझाईन्स आणि वार्षिक कामाचे 15 व  16 एप्रिल रोजी प्रदर्शन  आयोजित करण्यात आले आहे. बारावी उत्तीर्ण झालेले व आर्किटेक्चर ला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आर्किटेक्चर क्षेत्राची माहिती घेण्याची सुवर्णसंधी  यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे. 

डी.  वाय.  पाटील  स्कूल ऑफ आर्किटेक्चर, लाईन  बाजार येथे सकाळी ९  ते सायंकाळी ६  पर्यंत होणाऱ्या या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांच्या आर्किटेक्चरल डिझाईन, बिल्डिंग कंस्ट्रक्शन, ग्राफिक्स , इंटिरियर  डिझाईन, अर्बन  डिझाईन,तसेच अंतिम वर्षातील आर्किटेक्चरल प्रोजेक्ट इ. विषयांचे ड्रॉईन्ग्स  व मॉडेल्स मांडण्यात येणार आहेत.  

प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांच्या कामाबरोबरच त्यांचे इतर अनेक उपक्रम व छंद देखील मांडण्यात येणार आहेत.  प्रथम वर्षापासूनच विद्यार्थ्यांनी ३D  प्रिंटर चा वापर करून विविध मॉडेल्स व कलाकृती केल्या असून त्याचा आर्किटेक्चरल डिझाईन मध्ये कसा वापर करता येतो हे सादर केले आहे. द्वितीय ते चतुर्थ वर्गातील विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमामध्ये व्हॅल्यू एडेड कोर्सेस व अद्ययावत सॉफ्टवेअर्सचा वापर करून कलात्मक व नाविन्यपूर्ण डिझाइन्स केले आहेत. अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी डिजिटल टेकनॉलॉजि व अद्ययावत सॉफ्टवेअर्स चा वापर करून प्रोजेक्ट चे काम सादर केले आहे. अशा प्रकारच्या प्रदर्शनामागे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, सांघिक भावनेतून काम करण्याची प्रेरणा मिळावी व अभ्यासक्रमामध्ये नवनवीन प्रयोग करण्याची उमेद निर्माण व्हावी हा हेतू आहे.

बुधवार  15 एप्रिल  रोजी  सकाळी १०  वाजता  ऑल इंडिया इंस्टीटयूट ऑफ आर्किटेक्चरचे नॅशनल कौन्सिल मेंबर व नॅशनल  हेरिटेज  अँड   कॉन्सर्व्हशन  समितीचे  चेअरपर्सन आर्की. सतीशराज जगदाळे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाटन  होणार आहे. तर 16 एप्रिल रोजी  माजी विद्यार्थी आर्किटेक्ट अभिषेक नाईक व साकिब मुल्ला (बंगलोर) यांचा विद्यार्थ्यांसाठी सेमिनार आयोजित करण्यात आला आहे, सर्व विद्यार्थी व पालकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, विभाग प्रमुख आर्की. इंद्रजीत जाधव यांनी केले आहे. 

अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes