SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
के.एस.बी.पी. पार्क परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाईसामाजिक न्याय विभागाकडून लाभार्थ्यांना साहित्य वाटपसीएसआरद्वारे शहर विकासासाठी बँकर्सनी साथ द्यावी : आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांचे आवाहनडी. वाय. पाटील आर्किटेक्चर विद्यार्थ्यांच्या डिझाइन्सचे बुधवारपासून प्रदर्शनकोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात युरेका-जिज्ञासाचे आयोजन; राष्ट्रीय स्तरावरील शोध निबंध, प्रोजेक्ट व प्रेझेंटेशन स्पर्धानुतन आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडून विविध प्रकल्पांची पाहणीकोल्हापुरातील अनधिकृत बांधकामे अतिक्रमणांबाबत कोल्हापूर नेक्स्टचे महापौर यांना निवेदनपदवीधर मतदार संघावर महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हावे : आमदार राजेश क्षीरसागरकोल्हापुरात महापालिकेविरोधात 'बोंबमारो'चा कडकडाट; अमृत २.० च्या रखडलेल्या कामावरून भारतीय दलित महासंघ रस्त्यावरसाहित्यसम्राट बंकिमचंद्र चटर्जी: ज्यांच्या शब्दांतून 'वंदे मातरम' घुमले

जाहिरात

 

सीएसआरद्वारे शहर विकासासाठी बँकर्सनी साथ द्यावी : आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांचे आवाहन

schedule09 Apr 26 person by visibility 88 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचे नुतन आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी सीएसआरच्या माध्यमातून शहर विकासाला चालना देण्यासाठी शहरातील 15 राष्ट्रीयकृत व शेड्युल्ड कमर्शिअल बँकांच्या प्रतिनिधींची आज सायंकाळी 4 वाजता आयुक्त कार्यालयात बैठक घेतली.

यावेळी बोलताना आयुक्त डॉ. भारुड यांनी बँकांमध्ये उपलब्ध असलेल्या व्यावसायिक तज्ज्ञांच्या कौशल्याचा उपयोग शहर विकासासाठी करावा, असे सांगितले. महापालिकेच्या उद्यानांची देखभाल, सुशोभीकरण तसेच वॉर्ड कार्यालये व इतर सार्वजनिक ठिकाणी आवश्यक सुविधा सीएसआरच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी केले.  या उपक्रमास प्रतिसाद देत उपस्थित बँकर्सनी महापालिकेसोबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

 शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सीएसआर निधीचा प्रभावी वापर करण्यात येईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ व शिल्पा दरेकर, उपआयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक तसेच विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes