के.एस.बी.पी. पार्क परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाई
schedule09 Apr 26 person by visibility 86 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक 3 राजारामपुरी व अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत आज गुरुवारी के.एस.बी.पी. पार्क परिसर या ठिकाणी कारवाई करण्यात आली.
या कारवाई वेळी 2 लो़खडी अँगल, 1 टेबल, 2 हातगाडी, 4 काँउन्टर व इतर साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाई वेळी 19 हातगाडया मालकांनी स्वता:हून काढून घेतल्या.
सोमवारी झालेल्या जनता दरबारमध्ये अतिक्रमणाबाबत तक्रार अर्ज दाखल झाला होता. या अर्जाच्या अनुषंगाने व महापौर रुपाराणी निकम यांनी दिलेल्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागामार्फत ही कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान 1 जेसीबी, 2 ट्रॅक्टर ट्रॉली व 1 डंपरचा वापर करण्यात आला.
ही कारवाई महापौर रुपाराणी निकम यांच्या आदेशाने, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे, सहा.आयुक्त जयंत जावडेकर, शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली, उप-शहर अभियंता अरुण गुजर, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपीक सजन नागलोत, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व विभागीय कार्यालय क्रमांक.03 कडील कर्मचा-यांच्या पथकाकडून संयुक्तीक करण्यात आली.
तरी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने येथून पुढेही शहरामध्ये अनाधिकृत फेरीवाले व रोडवरील दुकाना बाहेर लावण्यात आलेल्या अनाधिकृत शेडवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधीत दुकान धारकांनी व फेरीवाल्यांनी आपले अनाधिकृत असलेले अतिक्रमण स्वत: काढून घ्यावे असे आवाहन महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.