SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आंतरराष्ट्रीय विद्यापीठ क्रीडा दिन: महत्त्व आणि उद्दिष्टकोल्हापुरात गौरी-गणपती विसर्जन: पर्यावरणपूरक उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसादराज्यपाल निवासस्थानातील गणरायाचे कृत्रिम हौदात विसर्जन; मातीत कडुलिंबाचे रोप लावणारजम्मू येथे ‘लोककलेतील श्रीगणेश’मधून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जागर‘अमृत-2’ अंतर्गत सर्व कामे मार्चअखेर पूर्ण करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसरुकडीतील गणेशोत्सव मंडळाच्या प्रांगणात ‘लोकसंवाद-2026’ उपक्रमाचे आयोजनगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात मोठी कारवाई; हद्दपार केलेले ९ सराईत गुन्हेगार जेरबंदडॉ. विलास व्ही. कारजिन्नी यांना ज्येष्ठ अभियंता (‘सीनियर इंजिनिअर) ऑनर २०२६’ पुरस्कारजागतिक खगोलशास्त्र दिन: अंतराळाचे रहस्य उलगडण्याचा दिवसशहापुरात मोठी कारवाई: ५ लाख ४ हजार रुपयांच्या एम.डी. ड्रग्जसह दोन आरोपींना अटक; स्थानिक गुन्हे शाखा आणि शहापूर पोलिसांची संयुक्त मोहीम

जाहिरात

 

रुकडीतील गणेशोत्सव मंडळाच्या प्रांगणात ‘लोकसंवाद-2026’ उपक्रमाचे आयोजन

schedule19 Sep 26 person by visibility 229 categoryराज्य

कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या उत्सवी वातावरणात शासनाच्या योजना आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने रुकडी येथील साई युवक मंच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या प्रांगणात ‘लोकसंवाद-2026’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

  याप्रसंगी उपस्थित युवक युवतींना क्रीडा संचालनाकडून क्रीडापट्टूंसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध क्रीडा योजनांची माहिती क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर विभागाचे उपसंचालक सुहास पाटील यांनी दिली.

 यावेळी बोलताना  पाटील म्हणाले, युवकांनी व्यायामाची आवड जोपासावी तसेच क्रीडापट्टूंनी डोपिंगपासून दूर रहावे. शाहू महाराजांनी तत्कालीन कालखंडात कोल्हापूरमध्ये क्रीडा संस्कृती रुजविली. या जिल्ह्याने देशाला अनेक नामवंत क्रीडापट्टू दिले आहेत. राज्य शासनाच्यावतीने खेळांडूसाठी शासकीय नोकरीत 5 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात तसेच ऑलिंपिक विजेत्या खेळाडूला राज्य शासन अनुक्रमे सुवर्ण - 5 कोटी, रौप्य - 3 कोटी तर कांस्य पदकासाठी 2 कोटी रुपये बक्षीस म्हणून देते. विद्यार्थी - युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी शालेय - जिल्हा प्रशिक्षण, खेलो इंडिया, तसेच मिशन लक्षवेध आदी योजना क्रीडा विभागाकडून राबविल्या जातात. कोणत्याही खेळात निपुण होण्यासाठी सातत्य महत्त्वाचे असते. खेळाडूंनी हे सातत्य बाळगावे तसेच दैनंदिन सरावाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

 माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांचे निरसन यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य बबलू मकानदार, मंडळाचे अध्यक्ष विशाल जाधव, उपाध्यक्ष पप्पू जमादार, बापू पवार, दामू दाते, पियुष देसले यांच्यासह इतर क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes