SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आंतरराष्ट्रीय विद्यापीठ क्रीडा दिन: महत्त्व आणि उद्दिष्टकोल्हापुरात गौरी-गणपती विसर्जन: पर्यावरणपूरक उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसादराज्यपाल निवासस्थानातील गणरायाचे कृत्रिम हौदात विसर्जन; मातीत कडुलिंबाचे रोप लावणारजम्मू येथे ‘लोककलेतील श्रीगणेश’मधून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जागर‘अमृत-2’ अंतर्गत सर्व कामे मार्चअखेर पूर्ण करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसरुकडीतील गणेशोत्सव मंडळाच्या प्रांगणात ‘लोकसंवाद-2026’ उपक्रमाचे आयोजनगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात मोठी कारवाई; हद्दपार केलेले ९ सराईत गुन्हेगार जेरबंदडॉ. विलास व्ही. कारजिन्नी यांना ज्येष्ठ अभियंता (‘सीनियर इंजिनिअर) ऑनर २०२६’ पुरस्कारजागतिक खगोलशास्त्र दिन: अंतराळाचे रहस्य उलगडण्याचा दिवसशहापुरात मोठी कारवाई: ५ लाख ४ हजार रुपयांच्या एम.डी. ड्रग्जसह दोन आरोपींना अटक; स्थानिक गुन्हे शाखा आणि शहापूर पोलिसांची संयुक्त मोहीम

जाहिरात

 

राज्यपाल निवासस्थानातील गणरायाचे कृत्रिम हौदात विसर्जन; मातीत कडुलिंबाचे रोप लावणार

schedule19 Sep 26 person by visibility 398 categoryराज्य

मुंबई :  राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या निवासस्थानी विराजमान पाच दिवसांच्या गणरायाचे शुक्रवारी (दि. 18) लोकभवन येथे फुलांनी सजवलेल्या कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले.

उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांच्या पुणे दौऱ्यामुळे राज्यपाल श्री. वर्मा मुंबईबाहेर असल्यामुळे लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी गणरायाची आरती केली व बाप्पाला निरोप दिला. राज्यपालांच्या सूचनेनुसार गणेश मूर्तीचे समुद्रात विसर्जन न करता निवासस्थानाबाहेर कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले.

राज्यपालांच्या निवासस्थानी मांडलेली श्रींची मूर्ती पर्यावरण स्नेही शाडू माती होती.  विसर्जित मूर्तीच्या मातीमध्ये कडुलिंबाचे रोप लावण्यात येणार आहे. राज्यपालांचे सहसचिव एस रामामूर्ती, परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे, जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर, तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes