SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डॉ. विलास व्ही. कारजिन्नी यांना ज्येष्ठ अभियंता (‘सीनियर इंजिनिअर) ऑनर २०२६’ पुरस्कारजागतिक खगोलशास्त्र दिन: अंतराळाचे रहस्य उलगडण्याचा दिवसशहापुरात मोठी कारवाई: ५ लाख ४ हजार रुपयांच्या एम.डी. ड्रग्जसह दोन आरोपींना अटक; स्थानिक गुन्हे शाखा आणि शहापूर पोलिसांची संयुक्त मोहीमकोल्हापुरात मोठी कारवाई: ७ किलो अफू पावडरसह राजस्थानी इसम गजाआड; १ लाखाचा मुद्देमाल जप्तकृष्णा नदीपात्रात ७०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग; पाटबंधारे विभागाला आमदार यड्रावकर यांच्या सूचना गौरी-गणपती विसर्जनासाठी कोल्हापूर महापालिकेची यंत्रणा सज्ज; ३०० आयशर, ६५० हमालांसह अडीच हजारांहून अधिक कर्मचारी तैनातवारणा विद्यापीठाच्या कोरे अभियांत्रिकीत आंतरराष्ट्रीय विद्यार्थिनीचा प्रवेशआयएसटीई नवी दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यकारी परिषद सदस्यपदी डॉ. महादेव नरके यांची बिनविरोध निवडपाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेची धडक मोहीम; महिनाभरात ५३ लाख ८२ हजाराची वसुली आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन: समान कामासाठी समान वेतन का गरजेचे?

जाहिरात

 

शहापुरात मोठी कारवाई: ५ लाख ४ हजार रुपयांच्या एम.डी. ड्रग्जसह दोन आरोपींना अटक; स्थानिक गुन्हे शाखा आणि शहापूर पोलिसांची संयुक्त मोहीम

schedule18 Sep 26 person by visibility 399 categoryगुन्हे

इचलकरंजी : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अवैध व्यवसाय आणि मनोविकारावर परिणाम करणारे घातक अंमली पदार्थ जसे की गांजा, चरस, अफू आणि एम.डी. ड्रग्ज यांचा साठा व विक्री करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक  नीलोत्पल यांनी दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर शहापूर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संयुक्तरीत्या कारवाई करत, शहापूर हद्दीत ५ लाख ४ हजार रुपये किमतीच्या एम.डी. (M.D.) ड्रग्जसह दोन सराईत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व अंमलदार कारवाईसाठी सज्ज होते. दरम्यान, शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन यांना गोपनीय बातमीदाराकडून अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली की, शहापूर हद्दीतील शहापूर ओढा ते आर.के. नगरकडे जाणाऱ्या रोडवर पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार पिंटू उर्फ धनाजी पांडुरंग जाधव हा अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार आहे.

मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे शहापूर पोलीस ठाण्याच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती सुरेखा गाताडे, पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत पंचांसमक्ष संबंधित ठिकाणी सापळा रचला. ठरलेल्या ठिकाणी पिंटू उर्फ धनाजी पांडुरंग जाधव हा चालत येत असल्याचे दिसून येताच पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत व कब्जात पारदर्शक प्लॅस्टिकच्या लहान पिशवीमध्ये पांढरट बारीक पावडरच्या स्वरूपात २८ ग्रॅम वजनाचे (प्रति ग्रॅम १८,०००/- रुपये प्रमाणे) एकूण ५,०४,०००/- रुपये किमतीचे एम.डी. सदृश अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले दिसून आले.

पोलिसांनी कसून चौकशी केली असता, सदर एम.डी. ड्रग्ज हे सिध्दार्थ बडे (रा. इचलकरंजी, कोल्हापूर) याच्याकडून आणल्याची कबुली आरोपीने दिली. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात सहायक फौजदार अविनाश रामचंद्र मुंगसे यांच्या फिर्यादीवरून एन.डी.पी.एस. (NDPS) कायदा कलम ८(क), २२(ब), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या गुन्ह्यात पिंटू उर्फ धनाजी पांडुरंग जाधव आणि सिद्धार्थ बडे या दोन आरोपींना निष्पन्न करून कायदेशीर कारवाई सुरू आहे.

सदरची ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक  नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक  आण्णासाहेब जाधव, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी  विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, शहापूरच्या म.सहा.पोलीस निरीक्षक सुरेखा गाताडे, पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन, सहा. फौजदार अविनाश मुंगसे, संजीव कराड तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व शहापूर पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदारांच्या पथकाने अत्यंत यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes