SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आंतरराष्ट्रीय विद्यापीठ क्रीडा दिन: महत्त्व आणि उद्दिष्टकोल्हापुरात गौरी-गणपती विसर्जन: पर्यावरणपूरक उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसादराज्यपाल निवासस्थानातील गणरायाचे कृत्रिम हौदात विसर्जन; मातीत कडुलिंबाचे रोप लावणारजम्मू येथे ‘लोककलेतील श्रीगणेश’मधून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जागर‘अमृत-2’ अंतर्गत सर्व कामे मार्चअखेर पूर्ण करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसरुकडीतील गणेशोत्सव मंडळाच्या प्रांगणात ‘लोकसंवाद-2026’ उपक्रमाचे आयोजनगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात मोठी कारवाई; हद्दपार केलेले ९ सराईत गुन्हेगार जेरबंदडॉ. विलास व्ही. कारजिन्नी यांना ज्येष्ठ अभियंता (‘सीनियर इंजिनिअर) ऑनर २०२६’ पुरस्कारजागतिक खगोलशास्त्र दिन: अंतराळाचे रहस्य उलगडण्याचा दिवसशहापुरात मोठी कारवाई: ५ लाख ४ हजार रुपयांच्या एम.डी. ड्रग्जसह दोन आरोपींना अटक; स्थानिक गुन्हे शाखा आणि शहापूर पोलिसांची संयुक्त मोहीम

जाहिरात

 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात मोठी कारवाई; हद्दपार केलेले ९ सराईत गुन्हेगार जेरबंद

schedule19 Sep 26 person by visibility 233 categoryगुन्हे

कोल्हापूर : गणेशोत्सव काळात जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस अधीक्षक  नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. गणेशोत्सवाच्या मुदतीत कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले सराईत गुन्हेगार शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात बेकायदेशीरपणे वावरत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने राजारामपुरी आणि जुना राजवाडा पोलीस ठाणे हद्दीतून नियम मोडून विनापरवाना फिरणाऱ्या एकूण ९ सराईत आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे.

कारवाई करण्यात आलेले हद्दपार आरोपी:
 * राजारामपुरी पोलीस ठाणे हद्द:
   १. अजय अनिल पाथरवट (वय २६, रा. सायबर चौक, कोल्हापूर)
   २. अल्ताफ अकबर देवडी (वय २६, रा. यादवनगर, कोल्हापूर)
   ३. करण उदय सावंत (वय २५, रा. राजारामपुरी, कोल्हापूर)
   ४. मंदार मधुकर दिडे (वय २५, रा. यादवनगर, कोल्हापूर)
   ५. अविनाश शांताराम कोकाटे (वय २७, रा. मोतीनगर, कोल्हापूर)
   ६. अमोल नंदू हळदीकर (वय ३९, रा. टेंबलाईवाडी, कोल्हापूर)

 * जुना राजवाडा पोलीस ठाणे हद्द:
   १. विशाल बबन जाधव (वय ३२, रा. सुभाषनगर चौक, कोल्हापूर)
   २. सौरभ दीपक कांबळे (वय २७, रा. गंजीमाळ, कोल्हापूर)
   ३. सिद्धेश विनायक कांबळे (वय २३, रा. टिंबर मार्केट, कोल्हापूर)

पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक  आण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक  सुशांत चव्हाण व त्यांच्या पथकातील अंमलदारांनी ही धडक कारवाई पार पाडली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes