SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शंभर युनिटच्यावरच्या ग्राहकांना दिलासा द्या : आमदार सतेज पाटील यांची मागणीअवैध सावकारी प्रकरणांची चौकशी जिल्हाधिकारी स्तरावर : सहकार मंत्री बाबासाहेब पाटीलकोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाला विशेष प्राधिकरण करणार : उद्योग मंत्री उदय सामंतमहाराष्ट्रातील औद्योगिक वीजदर अन्य राज्यांपेक्षा होणार स्वस्त : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस'ऑपरेशन मुस्कान' आणि 'ऑपरेशन शोध'मुळे हजारो महिलांचा आणि बालकांचा शोध घेण्यात यश : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसघरगुती गार्डन वेस्ट संकलनासाठी कोल्हापूर महापालिकेची विशेष मोहीमप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल कोल्हापूरमध्ये 'इको क्लब'चे उद्घाटनतर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे विसाव्या शतकातील महत्त्वाचे प्रबोधनपुरूष: किशोर बेडकीहाळ; शिवाजी विद्यापीठात दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभअक्कलकोट येथे प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा पन्हाळगडावर निषेधकोरे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठात निवड

जाहिरात

 

महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

schedule15 Jul 25 person by visibility 232 categoryराज्य

* मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टेस्ला शोरूमचे उद्घाटन; भारतात टेस्लाची अधिकृत एंट्री

मुंबई : महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टेस्ला एक्सपीरियन्स सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला.

जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार निर्माता टेस्लाने भारतीय बाजारात प्रवेश केला आहे. मुंबईत त्यांच्या पहिल्या एक्सपीरियन्स सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धवसे व टेस्ला कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः मुंबईसाठी ही आनंदाची गोष्ट आहे,  की जगातील सर्वात स्मार्ट कार भारतात येत आहे.  याची सुरुवात महाराष्ट्रातून होत असून केंद्राच्या माध्यमातून टेस्लाने भारतात आपली सुरुवात करत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.

मुंबईतील टेस्लाचे सेंटर केवळ एक्सपीरियन्स सेंटर न राहता, डिलिव्हरी लोकेशन, लॉजिस्टिक सेंटर आणि सर्विसिंग युनिट देखील येथे सुरु करण्यात आले आहे. टेस्लाच्या कार्सचे बुकिंगही याठिकाणी सुरु झाले आहे. टेस्लाचे जगप्रसिद्ध मॉडेल “Model Y” आज भारतात लाँच करण्यात आले असून, या कारला १५ मिनिटांत चार्ज करता येते आणि ती एकदा चार्ज केल्यानंतर ६०० किमी धावू शकते. ही कार शून्य प्रदूषण करणारी असून, तिचे सेफ्टी फीचर्स जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानले जातात, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.


राज्य शासनाने इलेक्ट्रिक वाहने प्रोत्साहनासाठी अत्यंत डायनॅमिक पॉलिसी राबवली आहे. यामध्ये चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर, कर सवलती व मॅन्युफॅक्चरिंगसाठी विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. येत्या काळात महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन उद्योगात देशात आघाडीवर असेल. तसेच मुंबईनंतर भारतातील आणखी दोन शहरांमध्ये सेवा विस्तारित केली जाणार असून, मुंबईत चार मोठे चार्जिंग हब आणि ३२ चार्जिंग स्टेशन उभारली जात आहेत, असेही मुख्यमंत्री  फडणवीस यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes