SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कृषी सहायकांनी प्रत्यक्ष फिल्डवर जावे : पालकमंत्री प्रकाश आबिटकरकोल्हापूर: एसटी प्रवाशांचे दागिने लांबवणारी सराईत महिला जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाईकोल्हापूर : चारित्र्याच्या संशयावरून की जुना वाद? मलकापुरात मोठ्या भावाकडून सख्या भावाचा भीषण खूनमहापालिकेच्यावतीने भगवान गौतम बुध्द जयंती साजरीशिवाजी विद्यापीठात महाराष्ट्र दिन उत्साहातघुणकीत गौतम बुद्धांची २५८८ वी जयंती साजरीजागतिक चित्रपटसृष्टीचा भारतीय मानदंड: सत्यजित रायअसाही एक . . . आगळा वेगळा शाही विवाह सोहळा'आरोग्याच्या सवयी बालपणातच दृढ होतात' : स्वच्छता निरीक्षक स्वप्निल उलपे यांचे प्रतिपादनकामगारांच्या कष्टांवर महाराष्ट्राचे वैभव : मंत्री मंगलप्रभात लोढा

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठात महाराष्ट्र दिन उत्साहात

schedule02 May 26 person by visibility 112 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

 सकाळी ठीक ८ वाजता प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, आंतरविद्याशाखा अधिष्ठाता डॉ. अजय साळी, आयक्यूएसी संचालक डॉ. सागर डेळेकर, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्र संचालक डॉ. रामचंद्र पवार, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. सावलीराम घाणे आणि राष्ट्रीय सेवा योजना प्रभारी संचालक डॉ. कबीर खराडे यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

यावेळी संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थिनींसह सामूहिक राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत, वंदे मातरम तसेच विद्यापीठ गीत गायन करण्यात आले. प्र-कुलगुरू डॉ. जाधव यांच्यासह सर्व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प वाहून अभिवादन केले. प्र-कुलगुरूंनी सर्व उपस्थितांना महाराष्ट्र दिनासह कामगार दिन आणि बौद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes