SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कृषी सहायकांनी प्रत्यक्ष फिल्डवर जावे : पालकमंत्री प्रकाश आबिटकरकोल्हापूर: एसटी प्रवाशांचे दागिने लांबवणारी सराईत महिला जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाईकोल्हापूर : चारित्र्याच्या संशयावरून की जुना वाद? मलकापुरात मोठ्या भावाकडून सख्या भावाचा भीषण खूनमहापालिकेच्यावतीने भगवान गौतम बुध्द जयंती साजरीशिवाजी विद्यापीठात महाराष्ट्र दिन उत्साहातघुणकीत गौतम बुद्धांची २५८८ वी जयंती साजरीजागतिक चित्रपटसृष्टीचा भारतीय मानदंड: सत्यजित रायअसाही एक . . . आगळा वेगळा शाही विवाह सोहळा'आरोग्याच्या सवयी बालपणातच दृढ होतात' : स्वच्छता निरीक्षक स्वप्निल उलपे यांचे प्रतिपादनकामगारांच्या कष्टांवर महाराष्ट्राचे वैभव : मंत्री मंगलप्रभात लोढा

जाहिरात

 

असाही एक . . . आगळा वेगळा शाही विवाह सोहळा

schedule01 May 26 person by visibility 258 categoryसामाजिक

कोल्हापूर : तब्बल 105 वर्षाची शतकोत्तर परंपरा असलेल्या दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात राम गणेश गडकरी सभागृहात आज अनेक मान्यवर जमले होते. त्याला कारण ही तसेच होते .... महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी एक आगळ्या -वेगळ्या आंतरजातीय विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विवाह म्हटलं की प्रथम प्राधान्य असते ते वर अथवा वधू स्वजातीय,आपल्या धर्माचे आहेत का हे पाहणे.तथापि या परंपरेला छेद देत हा विवाह सोहळा साजरा होत होता .

     गुरव जातीतील रामचंद्र गुरव तर कायस्थ प्रभू जातीतील वधू गौरी चिटणीस या दोघांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता.यात विशेष ते काय ? विशेष तर आहेच.यातील वर 90% तर वधू 100% कर्णबधीर. मात्र त्यांनी आपल्यातील या उणीवांवर मात करत कुटुंबीयांच्या संमतीने आयुष्यभरासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला.

 

  त्यांच्या या निश्चयाला विनयकुमार मदनमोहन लोहिया कर्णबधीर विद्यालय व दिव्यांग कल्याण सक्षमीकरण कार्यालय (कोल्हापूर) यांनी पाठिंबा दिला. या विधायक निर्णयाला पाठिंबा व वधू - वरांना आशीर्वाद देण्यासाठी दस्तूरखुद्द जिल्हयाचे नूतन जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ जस्मिन,निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव आदी मान्यवर उपस्थित राहिले. 

    जिल्हा प्रशासनातील इतके मोठे पाहुणे पाहून वधु-वरासह उपस्थितांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले ! तर आयोजकांना कृत कृत झाल्यासारखे वाटले.सांकेतिक भाषा .... खाणा ...खुणा , हावभाव या सर्वांच्या पलीकडे जाऊन हा शाही विवाह सोहळा केवळ समाजाप्रती असलेल्या कारूण्य भावनेने पार पडला. 

                    
       या मंगल प्रसंगी संस्थाध्यक्ष निर्मलकुमार लोहिया,विनोदकुमार लोहिया,प्रशांत लोहिया, उपाध्यक्ष नितीन वाडीकर,श्रीमती अनेरी लोहिया नेमचंद संघवी,सचिव प्रभाकर हेरवाडे, प्रशालेचे मुख्याध्यापक मधुकर जाधव,साधना कांबळे,एस एस चव्हाण यांच्यासह तब्बल एक हजाराहून अधिक स्नेही - गुणीजणांच्या उपस्थित पार पडला .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes