पन्हाळा तहसिल कार्यालयात 21 जुलैला लोकशाही दिनाचे आयोजन
schedule15 Jul 25 person by visibility 260 categoryराज्य

कोल्हापूर : प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुका स्तरावर लोकशाही दिन साजरा करण्यात येतो. पन्हाळा तहसिल कार्यालय येथे 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजता तालुका लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती पन्हाळा तहसिलदार माधवी शिंदे यांनी दिली आहे.
या दिवशी नागरिकांनी आपल्या शासकीय कामकाजासंदर्भातील तक्रारी, अडचणी किंवा मागण्या लेखी स्वरुपात दोन प्रतीत सादर कराव्यात. संबंधित विभागांचे अधिकारी तसेच तालुकास्तरीय अधिकारी यावेळी उपस्थित राहून आलेल्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न करतील.
लोकशाही प्रणालीत नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून शासनाच्या पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि लोकसहभाग वाढवणाऱ्या या उपक्रमात सर्वसामान्य नागरिक, सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन तहसिल प्रशासनाने केले आहे.