भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी जल्लोषात साजरा
schedule12 Jun 26 person by visibility 195 categoryसामाजिक
🟠पांजरपोळ संस्थेतील गुरांना फळे, धान्य, चार्याचे वाटप, गरजूंना अन्न वाटप, एचआयव्हीग्रस्तांना खाऊ वाटप . रेल्वे स्टेशनवरील फिरस्त्यांना छत्र्यांचे वाटप आणि नशामुक्त महाराष्ट्र उपक्रमांतर्गत दुध वाटप
कोल्हापूर : भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा आज वाढदिवस... त्यानिमित्ताने कोल्हापुरातील भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकार्यांनी हा वाढदिवस संस्मरणीय बनवला. बॅनर, पोस्टर, हारतुरे यावरील खर्च टाळून युवा मोर्चाच्या पदाधिकार्यांनी आज दिवसभरात शिये इथल्या करुणालय संस्थेतील एचआयव्हीग्रस्त मुलांना खाऊचे वाटप केले. पांजरपोळ संस्थेतील जनावरांना एक ट्रॉली फळे, भाजी, दोन ट्रॉली चारा दिला. सीपीआर चौकात कोल्हापुरी थाळीच्या माध्यमातून अन्नदान, फिरस्त्यांना छत्र्या वाटप आणि नशामुक्त भारत अभियानाला बळ देण्यासाठी मिरजकर तिकटी येथे दूध वाटप उपक्रम राबवण्यात आला. या सर्वच उपक्रमांना समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
खासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र, युथ आयकॉन आणि भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा आज वाढदिवस. यानिमित्ताने कृष्णराज महाडिकप्रेमी तसेच धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भाजपा युवा मोर्चाच्यावतीने आज दिवसभरात विविध उपक्रम राबवण्यात आले.
दरम्यान हारतुरे आणू नका तसेच वाढदिवसाच्या शुभेच्छा असणारे डिजिटल फलक उभारु नका, असे आवाहन कृष्णराज महाडिक यांनी कार्यकर्त्यांना केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करवीर तालुक्यातील शिये इथल्या भाजपा पदाधिकार्यांच्यावतीने दिव्यांगांसाठी ६ व्हिल चेअर आणि ६ स्टीक आणि अन्य साहित्य देण्यात आले.
भागरीथी महिला संस्थेच्या कार्यालयात हे साहित्य प्रदान करण्यात आले. यावेळी संजय गांधी निराधार योजना सदस्य मारुती बुवा, करवीर पंचायत समिती सदस्य जयसिंग काशीद, दत्तात्रय चौगुले, अनिल जाधव, बाजीराव सातपुते, अमर उरुणकर, शिवानी पाटील, संगीता खाडे, पुष्पा पवार, अर्पिता जाधव यांच्यासह भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
करवीर तालुक्यातील शिये इथल्या एचआयव्हीग्रस्त मुलांच्या करुणालय या संस्थेत आज कृष्णराज महाडिक यांचा वाढदिवस साजरा झाला. या संस्थेतील मुलांना आपल्या पाल्यांप्रमाणे वाढवलेल्या आनंद बनसोडे यांनी करुणालय संस्थेची गरज स्पष्ट केली. तसेच या संस्थेला सढळ हाताने मदत देण्याचे आवाहन केले. भाजपा पदाधिकार्यांनी या संस्थेतील मुलांना खाऊचे वाटप केले.
दरम्यान आज दुपारी भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकार्यांनी उद्यमनगर इथल्या पांजरपोळ संस्थेत जाऊन अनोखा उपक्रम राबवला. कृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा कोल्हापूर महानगर युवा मोर्चाच्यावतीने पांजरपोळ संस्थेतील जनावरांना दोन ट्रॉली चारा देण्यात आला.
तसेच किरण शिराळे फौंडेशन आणि श्रीराम युवा प्रतिष्ठानच्यावतीने १०० कलिंगडे, २५ डझन अननस, ३० डझन केळी असे खाद्य, सिध्दार्थ शिराळे, वैभव राऊत, ओंकार म्हेतर, अथर्व जाधव, सिध्दांत जिरगे, शिवतेज देसाई, गौरव सरनाईक, तनिष्क पुरवंत, विवेक पाटील यांच्यामार्फत जनावरांना खाऊ घालण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी गोरक्षणाची शपथ घेतली.
दरम्यान गायत्री सेवाभावी संस्थेच्यावतीने गोरक्षणासोबतच जनावरांचे आरोग्य जपण्याचे काम केले जाते. आज कृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, या संस्थेच्या सुचित हिरेमठ, श्रीधर पाटील, शंभूराज पाटील, निखिल माने, निलेश खरबडे यांनी जनावरांना चारा दिला.
कोल्हापूर थाळीच्या माध्यमातून उदय प्रभावळे यांच्या अन्नदान उपक्रमाला आज भाजपा युवा मोर्चा कोल्हापूर महानगरच्या पदाधिकार्यांनी बळ दिले. सीपीआर चौकात या परिसरातील रुग्णांचे नातेवाईक तसेच फिरस्ते आणि भुकेल्यांना अन्नदान करण्यात आले. युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विश्वजीत पवार, सरचिटणीस वल्लभ देसाई, अनिकेत अतिग्रे, जयेश पाटील- घरपणकर, भुषण कानकेकर, अभिषेक भोसले, तलहा मणेर, रोहित कारंडे, देवयानी पाटील, पृथ्वीराज पुरोहित, अनिरूध्द भुर्के यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज रेल्वे स्टेशन तसेच स्टेशन बाहेरील मार्गावरील बस स्टॉप, फुटपाथवरील फिरस्ते, व्यावसायिक यांना छत्री वाटप करण्यात आले. १०० छत्र्या यावेळी गरजूंना देण्यात आल्या. या सर्वच उपक्रमांचे जिल्हाध्यक्ष विश्वजित पवार, सरचिटणीस वल्लभ देसाई, अनिकेत अतिग्रे, जयेश घरपणकर, तलहा मणेर, भूषण कानकेकर, अनिकेत सोलापुरे, पंकज बारड, अभिषेक भोसले, समर्थ चिले, देवयानी पाटील, निरंजन घाडगे, ऋषिराज पाटील, रोहित गोते, इब्राहिम मुजावर, यश उलपे, पृथ्वीराज पुरोहित, योगिराज सुतार उपस्थित होते.
दरम्यान सायंकाळच्या सुमारास भाजप कार्यालयात कृष्णराज महाडिक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. राज्याचे उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महापौर रुपाराणी निकम, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, राहुल चिकोडे, नगरसेवक विजयसिंह देसाई, माधुरी नकाते, विजयसिंह खाडे-पाटील, सुनील वाडकर, प्रिया तेंडुलकर, माधुरी व्हटकर, अभिजित खतकर, जिल्हा परिषद सदस्य काकासाहेब सावर्डेकर, नामदेव वाईंगडे, हैबतराव नाईक-निंबाळकर यांच्यासह चंद्रकांत संकपाळ, तानाजी फाले, बाबा जांभळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते शिवाजीराव पाटील, भागीरथी महिला संस्थेच्या पदाधिकारी, त्याशिवाय उत्तम बांडागळे, डॉ. अजय चौगुले, पृथ्वीराज मोरे, अभय तेंडुलकर, विजय महाडिक, अमर साठे, संग्राम पाटील, उद्योजक राजेश व्हटकर, रवींद्र कानकेकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्या महेश चौगुले, माजी नगरसेवक राजसिंह शेळके, अजित ठाणेकर, किरण नकाते, नीलेश देसाई, विजय सूर्यवंशी, रवींद्र मुतगी, सिटीझन फोरमचे प्रसाद जाधव, शिवानंद स्वामी, अनिरुध्द कोल्हापुरे, गजानन तोडकर, सांगलीचे शांतीनाथ कर्वे, नांदेडचे सलीम देशमुख, यवतमाळचे सुरजित गुप्ता, भाजप कार्यकारिणी सदस्य अजिंक्य हणबर, सरपंच शांताराम कांबळे, सूरगोंडा पाटील, सुदर्शन उपाध्ये, भूषण गुरव, शरद पवार, अभिजीत सूर्यवंशी, दिलीप मैत्राणी, विश्वजित पोवार, संग्रामसिंह जरग, महाधुरळाचे संपादक गुरुबाळ माळी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष भरत काळे, गणेश खाडे, बाबा जांभळे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे सदस्य, विविध तरुण मंडळं आणि तालीम संस्थांचे पदाधिकारी, सेवा सोसायटी, दूध संस्था यासह कला-क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी कृष्णराज महाडिक यांना शुभेच्छा दिल्या. भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी, युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान सायंकाळी मिरजकर तिकटी येथे भाजप युवा मोर्चाच्यावतीने दुध वाटप कार्यक्रम झाला. कृष्णराज महाडिक यांच्यासह पदाधिकार्यांच्या उपस्थितीत दूध वाटप करण्यात आले. मुंबई आणि गोरेगाव या ठिकाणी प्रमाणापेक्षा जास्त अंमलीपदार्थांचे प्राशन केल्याने तरूणांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे राज्यातही अंमली पदार्थांच्या सेवनातून अनेक तरूण अकाली मृत्यूमुखी पडत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने राबवलेला नशामुक्त महाराष्ट्र उपक्रम कौतुकास्पद आणि दिशादर्शक आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवल्याबद्दल पदाधिकार्यांचे अभिनंदन करतो, अशा शब्दात कृष्णराज महाडिक यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी भाजपचे पदाधिकारी, युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.