SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर: महायुतीची अमित शहांच्या दौऱ्यासाठी जय्यत तयारी; पाणी टंचाईवर मंत्री मुश्रीफ यांचे आश्वासनराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोकुळ दूध संघाचे ठराव शक्ती प्रदर्शनाने देणार; मंत्री हसन मुश्रीफ यांची माहितीनूतन इमारतीच्या बांधकामासाठी निधीची कमतरता जाणवणार नाही - मंत्री चंद्रकांतदादा पाटीलघरफाळा भरणेसाठी शनिवार व रविवारी महापालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्रे सुरुभाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी जल्लोषात साजराकोल्हापूर शहरात १३ जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा; धरणातील पाणीसाठा घटल्याने निर्णयडी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाला माजी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची सदिच्छा भेटकृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात सामाजिक उपक्रम; पांजरपोळ संस्थेतील मुक्या जनावरांना दिला आधारशिये येथे भाजप युवा मोर्चातर्फे दिव्यांगांना मदतीचा हात; कृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रमबल्क वेस्ट जनरेटर कार्यशाळेतून घनकचरा व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन

जाहिरात

 

शिये येथे भाजप युवा मोर्चातर्फे दिव्यांगांना मदतीचा हात; कृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

schedule12 Jun 26 person by visibility 328 categoryसामाजिक

कोल्हापूर  :  भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिये (करवीर) येथील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या वतीने एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. यानिमित्त गावातील दिव्यांग बांधवांसाठी ६ व्हील चेअर आणि ६ स्टिकचे वाटप करण्यात आले.

समाजातील गरजू आणि दिव्यांग व्यक्तींना आधार देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग लाभार्थ्यांना या साहित्याचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य मारुती बुवा, करवीर पंचायत समितीचे सदस्य जयसिंग काशीद यांच्यासह दत्तात्रय चौगुले, अनिल जाधव, बाजीराव सातपुते, अमोल उरुणकर, शिवाजी पाटील, संगीता खाडे, पुष्पा पवार आणि अर्पिता जाधव आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपा युवा मोर्चाच्या या उपक्रमाचे शिये परिसरातून कौतुक होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes