SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर: महायुतीची अमित शहांच्या दौऱ्यासाठी जय्यत तयारी; पाणी टंचाईवर मंत्री मुश्रीफ यांचे आश्वासनराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोकुळ दूध संघाचे ठराव शक्ती प्रदर्शनाने देणार; मंत्री हसन मुश्रीफ यांची माहितीनूतन इमारतीच्या बांधकामासाठी निधीची कमतरता जाणवणार नाही - मंत्री चंद्रकांतदादा पाटीलघरफाळा भरणेसाठी शनिवार व रविवारी महापालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्रे सुरुभाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी जल्लोषात साजराकोल्हापूर शहरात १३ जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा; धरणातील पाणीसाठा घटल्याने निर्णयडी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाला माजी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची सदिच्छा भेटकृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात सामाजिक उपक्रम; पांजरपोळ संस्थेतील मुक्या जनावरांना दिला आधारशिये येथे भाजप युवा मोर्चातर्फे दिव्यांगांना मदतीचा हात; कृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रमबल्क वेस्ट जनरेटर कार्यशाळेतून घनकचरा व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन

जाहिरात

 

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाला माजी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची सदिच्छा भेट

schedule12 Jun 26 person by visibility 100 categoryशैक्षणिक

🟠 जागतिक शिक्षण व कौशल्य विकासासाठी सहकार्याच्या नव्या संधींवर चर्चा

तळसंदे : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे माजी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे तसेच फ्रान्सस्थित जागतिक दर्जाच्या डिझाईन व सर्जनशील शिक्षण संस्थेच्या भारतीय उपक्रमाचे प्रमुख आणि रुबिका इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मनोज सिंह यांनी डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान जागतिक शिक्षण, कौशल्य विकास, विद्यार्थी व प्राध्यापक आदान-प्रदान, संयुक्त संशोधन आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्याच्या विविध संधींवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

डॉ. देवानंद शिंदे  व डॉ. मनोज सिंह  यांचे  कुलगुरू प्रा. (डॉ.) अनिलकुमार एस. गुप्ता यानी स्वागत केले.  बैठकीदरम्यान राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, बहुविषयक शिक्षण, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम, उद्योजकता विकास, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि विद्यार्थ्यांच्या जागतिक स्पर्धात्मकतेसाठी आवश्यक कौशल्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. विशेषतः कृषी, अन्न तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, डिझाईन, डिजिटल तंत्रज्ञान आणि नवोपक्रम क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण व प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी परस्पर सहकार्याच्या शक्यता तपासण्यात आल्या.

रुबिका इंडिया आणि डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ यांच्यामध्ये भविष्यात सामंजस्य करार (MoU) करण्याबाबत प्राथमिक स्तरावर सकारात्मक विचारविनिमय झाला. या संभाव्य सहकार्याअंतर्गत विद्यार्थी व प्राध्यापक विनिमय कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप, संयुक्त प्रमाणपत्र अभ्यासक्रम, जागतिक तज्ज्ञांची व्याख्याने, संशोधन प्रकल्प तसेच परदेशातील उच्च शिक्षण व कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली.

डॉ. मनोज सिंह यांनी विद्यार्थ्यांना जागतिक शिक्षणाच्या संधी, डिझाईन थिंकिंग, सर्जनशीलता आणि नवोपक्रम यांचे महत्त्व पटवून देत जागतिक दर्जाच्या संस्थांशी सहकार्य वाढविण्याची गरज अधोरेखित केली. तर डॉ. देवानंद शिंदे यांनी उच्च शिक्षण संस्थांनी उद्योग, संशोधन आणि आंतरराष्ट्रीय भागीदारी यांचा समन्वय साधून विद्यार्थ्यांना भविष्याभिमुख शिक्षण देण्याची आवश्यकता व्यक्त केली.

कुलगुरू प्रा. (डॉ.) अनिलकुमार एस. गुप्ता यांनी विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाच्या धोरणाची माहिती देत विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील शिक्षण, संशोधन आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध असल्याचे सांगितले.

शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि जागतिक सहकार्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल मानल्या जाणाऱ्या या भेटीमुळे विद्यापीठासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन भागीदारीचे मार्ग खुले होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

यावेळी  कुलसचिव प्रा. (डॉ.) जयेंद्र ए. खोत, कॅम्पस संचालक प्रा. (डॉ.) सुहास एस. पाटील, फार्म ऑपरेशन्स प्रमुख इंजी. अमोल बी. गाताडे, मुख्य वित्त अधिकारी श्री. सुजित एस. सरनाईक, परीक्षा नियंत्रक डॉ. गुरुनाथ मोटे,  विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, संचालक, विभागप्रमुख तसेच प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes