SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आता आठवड्यातील सातही दिवस सकाळी आणि संध्याकाळी कोल्हापूर- मुंबई मार्गावर मिळणार विमानसेवा, खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नांना यशकर्तृत्ववान, शिस्तप्रिय आणि निश्चयी नेतृत्व असलेल्या अजितदादांच्यारूपाने वैयक्तिक मित्र गमावला क्षयरोग दुरीकरण मोहिमेत राज्यस्तरावर कोल्हापूरचा गौरवनगररचना, घरफाळा, पाणीपुरवठा, इस्टेट व परवाना विभागांच्या वसुलीचाआयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी घेतला आढावाभाजपा महिला, युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा जाहीर निषेधनाविन्याचा शोध घ्या : डॉ. रत्नाकर पंडित; ग. गो. जाधव अध्यासनात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहातशिक्षणशास्त्र अधिविभाग शिवाजी विद्यापीठ येथे माजी विद्यार्थी व पालक मेळावा उत्साहात कोल्हापुरात १५ मार्च रोजी 'विधी सेवा महाशिबिर'; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतला तयारीचा आढावाए.एन.एम. प्रथम वर्ष शपथविधी समारंभ उत्साहात येत्या गुरुवारी 'इग्नाईट महाराष्ट्र' एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

जाहिरात

 

धक्कादायक: चैनीसाठी नातवानेच केला आजीचा 'स्लो पॉयझनिंग'ने खून; कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखे कडून छडा

schedule21 Feb 26 person by visibility 282 categoryगुन्हे

गंगावेश येथील शुक्रतारा अपार्टमेंटमध्ये ७२ वर्षीय उषा मारुती भिऊंगडे यांचा झालेला मृत्यू नैसर्गिक नसून, त्यांच्या पोटच्या नातवानेच दागिन्यांच्या हव्यासापोटी केलेला खून असल्याचे उघड झाले आहे. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने  या प्रकरणाचा तांत्रिक तपास करून आरोपी नातू प्रेम परशराम भिऊंगडे (वय २०) याला अटक केली आहे.


१६ फेब्रुवारी रोजी उषा भिऊंगडे मृतावस्थेत आढळल्या होत्या. त्यांच्या अंगावरील सोन्याच्या ६ पाटल्या आणि साखळ्या गहाळ असल्याने घातपाताचा संशय होता. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या पथकाने तपास केला असता, घटनेच्या दिवशी प्रेम घरात येऊन गेल्याची माहिती मिळाली. पोलिसी खाक्या दाखवताच प्रेमने गुन्ह्याची कबुली दिली.

चैनीसाठी पैशांची गरज असल्याने प्रेमने आजीच्या चहातून विषारी द्रव्य दिले. आजीचा मृत्यू नैसर्गिक वाटावा यासाठी त्याने हा बनाव रचला होता. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी पथकाचे कौतुक केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes