SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
बारावा आंतरराष्ट्रीय योगदिन शिवाजी विद्यापीठात उत्साहात साजरा, योग साधना ही जीवन पध्दती बनवण्याची गरज : खासदार धनंजय महाडिकऑलिंपिकपटू बंडा पाटील यांना 'खाशाबा जाधव' पुरस्कार जाहीरआंतरराष्ट्रीय योग दिवस: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचा भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांसमवेत योगाभ्यासआजारांना दूर ठेवण्यासाठी योग हा रामबाण उपाय : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसशाहू महाराजांच्या विचारांचा वारसा यड्रावकर बंधू चालवत आहेत : उद्योग मंत्री उदय सामंतरोटरी सेंट्रलचे डॉ.शेंडगे प्रेसिडेंट तर अविनाश चिकनिस सेक्रेटरीडॉ . बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटची 100 % निकालाची परंपरा कायम ; विशेष प्राविण्यसह विद्यार्थ्यांची उल्लेखनीय भरारीयोगातून निरोगी जीवनाचा संदेश; ‘गोकुळ’मध्ये जागतिक योग दिन साजरा...कोल्हापूर : योग दिन उत्साहात संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिन: शरीर, मन आणि आत्म्याचा अद्भुत संगम

जाहिरात

 

कोल्हापूर : योग दिन उत्साहात संपन्न

schedule21 Jun 26 person by visibility 148 categoryसामाजिक

कोल्हापूर : जिल्हा प्रशासन, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा, कोल्हापूर विभाग, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय,माय भारत व सार्वजनिक आरोग्य विभाग,कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सकाळी ७ ते ९ या वेळेत महासैनिक दरबार हॉलमध्ये जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला .

   यावेळी आयुष मंत्रालयाचा कॉमन योगा प्रोटोकॉल,जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंनी केलेली योगाची प्रात्यक्षिके तसेच पहिल्या आंतरराष्ट्रीय योगासन क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त विजेता रोहित चव्हाण,१७ वर्षा खालील जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेल्या रोहिणी देवबा व हर्षवर्धन पाटील, इनर्व्हिल क्लब आयोजित योगास्पर्धेत प्रथम क्रमांकासह योगा क्विन पुरस्कार प्राप्त गंधाली खोपकर आदी खेळाडूंचा तर रविभुषण कुमठेकर व संदीप पाटील या योग मार्गदर्शकांचा शाल,रोप तसेच प्रमाणपत्र तसेच देवून जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

संपूर्ण जगभर 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येतो.आजच्या धकाधकीच्या व तणावपूर्ण जीवनात योग ही काळाची गरज बनली आहे .योगामुळे केवळ शारीरिक स्वास्थ्य नव्हे तर मानसिक सकारात्मक विचार व निरोगी जीवनशैली विकसित होण्यास मदत होते. याप्रसंगी जिल्हा प्रशासन, जिल्हा नियोजन समिती व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्ती अभियानाची शपथ घेण्यात आली.ही शपथ प्रा डॉ.श्वेता पुरुळेकर यांनी उपस्थितांना दिली.तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते योग मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात

या योग दिनासाठी क्रीडा व युवक सेवा उपसंचालक सुहास पाटील,उपजिल्हाधिकारी शक्ती कदम,जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सरिता थोरात,तालुका क्रीडा अधिकारी एल.जी. पवार,सुधाकर जमादार, मनिषा पाटील,क्रीडा अधिकारी अरुण पाटील, रोहिणी मोकाशी, स्नेहल जगताप-पाटील, राज्य क्रीडा मार्गदर्शक सिमा पाटील,माय भारतचे निलेश कांबळे,हॉकी प्रशिक्षक सागर जाधव आदी उपास्थित होते.कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षक शिवाजी पाटील यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes