SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
बारावा आंतरराष्ट्रीय योगदिन शिवाजी विद्यापीठात उत्साहात साजरा, योग साधना ही जीवन पध्दती बनवण्याची गरज : खासदार धनंजय महाडिकऑलिंपिकपटू बंडा पाटील यांना 'खाशाबा जाधव' पुरस्कार जाहीरआंतरराष्ट्रीय योग दिवस: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचा भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांसमवेत योगाभ्यासआजारांना दूर ठेवण्यासाठी योग हा रामबाण उपाय : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसशाहू महाराजांच्या विचारांचा वारसा यड्रावकर बंधू चालवत आहेत : उद्योग मंत्री उदय सामंतरोटरी सेंट्रलचे डॉ.शेंडगे प्रेसिडेंट तर अविनाश चिकनिस सेक्रेटरीडॉ . बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटची 100 % निकालाची परंपरा कायम ; विशेष प्राविण्यसह विद्यार्थ्यांची उल्लेखनीय भरारीयोगातून निरोगी जीवनाचा संदेश; ‘गोकुळ’मध्ये जागतिक योग दिन साजरा...कोल्हापूर : योग दिन उत्साहात संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिन: शरीर, मन आणि आत्म्याचा अद्भुत संगम

जाहिरात

 

डॉ . बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटची 100 % निकालाची परंपरा कायम ; विशेष प्राविण्यसह विद्यार्थ्यांची उल्लेखनीय भरारी

schedule21 Jun 26 person by visibility 313 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (एमएसबीटीई) यांच्यावतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा 2026 च्या निकालात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीने  100% निकालाची परंपरा कायम ठेवत  उल्लेखनीय यश संपादन केले. विशेष प्राविण्यसह प्रथम श्रेणी मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची  संख्या लक्षणीय आहे. या यशामुळे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. या विशेष यशासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 

इन्स्टिट्यूटचे  वैशिष्ट्य म्हणजे केवळ संख्यात्मक निकालावर भर न देता गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य दिले . प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असून उद्योगजगताच्या गरजांनुसार कौशल्यविकासावर विशेष भर दिला जात आहे .अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग, अत्याधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, डिजिटल शिक्षण सुविधा तसेच विद्यार्थ्यांना दिले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन यांचा विद्यार्थ्यांच्या यशामध्ये मोलाचा वाटा आहे. नियमित अध्यापनाबरोबरच विषयतज्ज्ञांची विशेष व्याख्याने, अतिरिक्त सराव परीक्षा, शंका निरसन सत्रे आणि करिअर मार्गदर्शन उपक्रम इन्स्टिट्यूटमध्ये राबविण्यात येतात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून त्यांना गुणवत्तापूर्ण यश प्राप्त करण्यास मदत होते.

यशाबद्दल समाधान व्यक्त करताना संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  कौस्तुभ गावडे म्हणाले, “विद्यार्थ्यांचे हे यश त्यांच्या कठोर परिश्रमाचे आणि शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाचे फलित आहे. गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षण देण्याच्या आमच्या ध्येयाला या निकालाने अधिक बळ मिळाले आहे.” संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी म्हणाले, “विद्यार्थ्यांना सक्षम तांत्रिक व्यावसायिक बनविण्यासाठी आम्ही आधुनिक अध्यापन पद्धती आणि कौशल्याधारित शिक्षणावर भर देत आहोत. भविष्यातही उत्कृष्ट निकालांची परंपरा कायम ठेवण्यासाठी संस्थेचे प्रयत्न अधिक जोमाने सुरू राहतील.”

इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे  म्हणाले, “तांत्रिक ज्ञानाबरोबरच उद्योगाभिमुख कौशल्ये विकसित करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी संपूर्ण संस्थेची टीम सातत्याने कार्यरत आहे.”

गत अनेक वर्षांपासून तांत्रिक शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीची परंपरा जपणाऱ्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीने  गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्तबद्ध वातावरण आणि विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांच्या बळावर राज्यातील अग्रगण्य तंत्रनिकेतनांमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. यंदाचा निकाल हा संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा गौरवास्पद ठेवा असल्याची भावना पालकांनी  व्यक्त केली. सर्व विभागप्रमुख, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासहित समाजाच्या विविध घटकातून सर्व  विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे. 

🟣 निकाल पुढीलप्रमाणे : 
▪️आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग विभाग :  तृतीय वर्ष - अनुष्का ओतारी 94.35%, अथर्व परीट 94.35%, तानिया काठीगर 93.76% ;द्वितीय वर्ष - दीक्षा तिवारी 94.2% रिद्धीमा बुधले  93.67%%  श्रावणी जमसंडेकर 89.11%, ;प्रथम वर्ष  - ऋग्वेदी दुपद 90.24% , वेदिका  आळवेकर ,90.12%, चिन्मयी कवडे 89.41%
कॉम्पुटर इंजिनिअरिंग विभाग: तृतीय वर्ष - समृद्धी नरके 96.12%, श्रावणी आडनाइक 95.41%,  वैष्णवी  भांदिगरे 94.41%; द्वितीय वर्ष -पायल पाटील 92.82%, सचदेव वाय दिलीप कुमार 92.00%, अधिराज कोळेकर 91.88% ; प्रथम वर्ष  -  अक्षरा शिंगाडे  88.62%, सिद्धी पाटील 88.59%, श्रावणी माने 87.29% 

▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग  : तृतीय वर्ष - सनराज पाटील 92.56%, सृष्टी देसाई 90.56%, सार्थक मोरे 83.72%; द्वितीय वर्ष- केदार सावंत 81%, वरद हावळ 79.11%, ईशांत पोवाळकर 78.44%, अथर्व पिसाळ 78.44% ; प्रथम वर्ष - सप्तश्री पाटील  80.22%, साई गायकवाड 77%, मानसी मोहिते 73.89%

▪️इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग: तृतीय वर्ष- श्रीजीत कळंत्रे 92.32%, विद्या पवार - 92.21%,निदा जकाते 91.90%;  द्वितीय वर्ष- राजवीर पाटील 91.41%,  श्रुती नरके 89.53% , प्रणव माने 86.47% ; प्रथम वर्ष  -  अंकिता गावडे 83.77%, प्रणाली गावडे 83.65% ,अक्षरा पाटील  78.94%

▪️सिव्हिल  इंजिनिअरिंग विभाग  : तृतीय वर्ष - प्रिन्स सिंग 88%, पार्थ यादव 85.40%, मयुरी मोरे 84% ; द्वितीय वर्ष - नारायणी सुतार 90% , श्रावण माने 89.78%, अनुष्का पाटील 85.56% ; प्रथम वर्ष - वैष्णवी पडळकर 87.33%, सिद्धी पाटील 79.67, क्षितिज पाटील 78.56%

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes