SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
बारावा आंतरराष्ट्रीय योगदिन शिवाजी विद्यापीठात उत्साहात साजरा, योग साधना ही जीवन पध्दती बनवण्याची गरज : खासदार धनंजय महाडिकऑलिंपिकपटू बंडा पाटील यांना 'खाशाबा जाधव' पुरस्कार जाहीरआंतरराष्ट्रीय योग दिवस: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचा भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांसमवेत योगाभ्यासआजारांना दूर ठेवण्यासाठी योग हा रामबाण उपाय : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसशाहू महाराजांच्या विचारांचा वारसा यड्रावकर बंधू चालवत आहेत : उद्योग मंत्री उदय सामंतरोटरी सेंट्रलचे डॉ.शेंडगे प्रेसिडेंट तर अविनाश चिकनिस सेक्रेटरीडॉ . बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटची 100 % निकालाची परंपरा कायम ; विशेष प्राविण्यसह विद्यार्थ्यांची उल्लेखनीय भरारीयोगातून निरोगी जीवनाचा संदेश; ‘गोकुळ’मध्ये जागतिक योग दिन साजरा...कोल्हापूर : योग दिन उत्साहात संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिन: शरीर, मन आणि आत्म्याचा अद्भुत संगम

जाहिरात

 

ऑलिंपिकपटू बंडा पाटील यांना 'खाशाबा जाधव' पुरस्कार जाहीर

schedule21 Jun 26 person by visibility 138 categoryसामाजिक

कोल्हापूर  : ध्रुवतारा फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा मानाचा चौथा 'खाशाबा जाधव पुरस्कार' १९६४ चे ऑलिंपिकपटू बंडा पाटील यांना जाहीर झाला आहे. मंगळवार, २३ जून रोजी सकाळी १० वाजता कोल्हापूरच्या ऐतिहासिक मेन राजाराम हायस्कूलच्या सभागृहात एका विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान केला जाणार असून, यात शाल, श्रीफळ, गौरवचिन्ह, रोख ५ हजार रुपये आणि पुस्तकाचा समावेश आहे.

 उद्योजक रोहित मुसळे आणि मनिष झंवर यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडणार असून, याप्रसंगी विविध क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचाही गौरव केला जाणार असल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष व लेखक संजय दुधाणे यांनी सांगितले. या पुरस्काराचे हे चौथे वर्ष असून, यापूर्वी मनोज पिंगळे, बालारफिक शेख आणि हर्षवर्धन सदगीर यांना या मानाने गौरवण्यात आले आहे.

 ऑलिंपिक दिनाचे औचित्य साधून लेखक संजय दुधाणे यांचे कोल्हापूर आणि कराडमध्ये तीन विशेष कार्यक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये २२ जून रोजी आदर्श प्रशाला (शिवाजी पेठ) येथे विद्यार्थ्यांशी संवाद, २३ जून रोजी मुख्य पुरस्कार सोहळा आणि कराडमध्ये 'लेखक आपल्या भेटीला' या उपक्रमाद्वारे खाशाबा जाधव यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकला जाणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes