SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
बारावा आंतरराष्ट्रीय योगदिन शिवाजी विद्यापीठात उत्साहात साजरा, योग साधना ही जीवन पध्दती बनवण्याची गरज : खासदार धनंजय महाडिकऑलिंपिकपटू बंडा पाटील यांना 'खाशाबा जाधव' पुरस्कार जाहीरआंतरराष्ट्रीय योग दिवस: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचा भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांसमवेत योगाभ्यासआजारांना दूर ठेवण्यासाठी योग हा रामबाण उपाय : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसशाहू महाराजांच्या विचारांचा वारसा यड्रावकर बंधू चालवत आहेत : उद्योग मंत्री उदय सामंतरोटरी सेंट्रलचे डॉ.शेंडगे प्रेसिडेंट तर अविनाश चिकनिस सेक्रेटरीडॉ . बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटची 100 % निकालाची परंपरा कायम ; विशेष प्राविण्यसह विद्यार्थ्यांची उल्लेखनीय भरारीयोगातून निरोगी जीवनाचा संदेश; ‘गोकुळ’मध्ये जागतिक योग दिन साजरा...कोल्हापूर : योग दिन उत्साहात संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिन: शरीर, मन आणि आत्म्याचा अद्भुत संगम

जाहिरात

 

रोटरी सेंट्रलचे डॉ.शेंडगे प्रेसिडेंट तर अविनाश चिकनिस सेक्रेटरी

schedule21 Jun 26 person by visibility 189 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलचे प्रेसिडेंट म्हणून डॉक्टर भूषण शेंडगे आणि सेक्रेटरी म्हणून उद्योजक अविनाश चिकनीस यांनी पदभार स्वीकारला. ज्येष्ठ रोटेरियन सी.एम .बेंद्रे यांच्या हस्ते पदग्रहण सोहळा झाला.

यावेळी बोलताना बेंद्रे यांनी रोटरीच्या  माध्यमातून माणुसकी जपत समाजातील विविध घटकांना मदत करण्याबरोबरच त्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी  सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मावळते प्रेसिडेंट अभिजीत भोसले यांनी गेल्या वर्षभरातील उपक्रमांची माहिती दिली.

नूतन प्रेसिडेंट डॉ.शेंडगे यांनी आपल्या कार्यकाळात सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबविण्याचा मनोदय व्यक्त केला.  सेक्रेटरी अविनाश चिकनिस यांनी आभार मानले.

रवी खोत, आर. वाय.पाटील यांचा उत्कृष्ट रोटेरियन म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी असिस्टंट गव्हर्नर अभयसिंह बिचकर, संजय साळोखे, नीलेश पाटील यांच्यासह रोटेरियन आणि कुटुंबीय उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप साळोखे यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes