SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
ईस्टर निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छाजयसिंगराव पवार यांच्या जाण्याने मराठा इतिहासाचा संदर्भग्रंथ काळाच्या पडद्याआड गेला : आमदार सतेज पाटील; कुटुंबियांची सांत्वनपर भेटइंधन साठा मुबलक; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचे देशभरात 'धाडसत्र'बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करा; महायुतीचे सर्व पक्षांना आवाहनवर्तमान व भविष्यातील आव्हानांचा विचार करुन शैक्षणिक पद्धतीला नवी दिशा आवश्यक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्रात ‘तंत्रज्ञान स्त्रोत केंद्रा’चे थाटात उद्घाटनअखिल भारतीय कनोईंग व कयाकिंग स्पर्धांना सांगलीत उद्यापासून प्रारंभनाटो (NATO): जागतिक सुरक्षिततेचे अभेद्य कवच आणि ७७ वर्षांचा प्रवासरंकाळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच; विद्रुपीकरण होवू देणार नाही : आमदार राजेश क्षीरसागरसी. पी. आर. चे नूतनीकरण एप्रिल अखेर पूर्ण करून एक मे रोजी लोकार्पणासाठी सज्ज करूया - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रशासनाला निर्देश

जाहिरात

 

अखिल भारतीय कनोईंग व कयाकिंग स्पर्धांना सांगलीत उद्यापासून प्रारंभ

schedule04 Apr 26 person by visibility 85 categoryक्रीडा

🟠 उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

 कोल्हापूर : भारतीय विद्यापीठे महासंघ (ए.आय.यू.) आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कनोईंग व कयाकिंग (पुरुष व महिला) स्पर्धांना सांगली येथे उद्यापासून (रविवार, दि. ५) प्रारंभ होत आहे. महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्या सकाळी ९ वाजता कै. वसंत दादा पाटील स्मृती स्मारक, कृष्णा नदी घाट येथील रॉयल बोट क्लब येथे स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी असतील.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल कार्यालयाचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे उपस्थित राहणार असून सन्माननीय अतिथी म्हणून सांगलीचे आमदार धनंजय उर्फ सुधीर गाडगीळ, महापौर धीरज सूर्यवंशी, जिल्हाधिकारी मैनक घोष, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांचीही यावेळी उपस्थिती असेल.

या स्पर्धेत देशभरातील ४० विद्यापीठांमधून ६८५ पुरुष व महिला खेळाडू सहभागी होणार आहेत. प्रत्यक्ष स्पर्धा ५ एप्रिल रोजी सकाळी सात वाजता सुरू होतील. स्पर्धेत कयाकिंग मध्ये K1, K2, K4 तसेच कनोईंग मध्ये C1, C2 असे 200 मी. 500 मी. व 1000 मी. या जलक्रीडा प्रकारात स्पर्धा होतील. सदर स्पर्धेचा लाभ सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी खेळाडू यांनी घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes