SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर : लोकशाही दिनी 22 तक्रार अर्ज दाखलमंत्रालयात पुनमताई तोडकर यांनी घेतली मंत्री छगन भुजबळ यांची सदिच्छा भेटकागल उरुसात भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या : मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अधिकाऱ्यांना सूचनाराजापूरवाडी येथील आरोग्य शिबिरात २९७ नागरिकांची तपासणीवारणा विद्यापीठाच्या पहिल्या युवा महोत्सवात कलागुणांचा जल्लोष!करवीर तालुक्यातील ५००० रेशन कार्ड धारकांचे बंद केलेले रेशन तात्काळ सुरू करा; शिवसेनेचे उचगाव येथे हुपरी-कोल्हापूर रस्ता रोको आंदोलनशिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कौस्तुभ गावडे प्रयत्नशील राहतील :राजे समरजितसिंह घाटगे यांचा विश्वासवीज पडून मृत्यू झालेल्या म्हाकवेतील तरुण शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना शासनाकडून चार लाखाची मदत.....महिला सक्षमीकरण हीच खऱ्या अर्थाने काळाची गरज : पुनमताई तोडकरगोकुळमार्फत ‘गोकुळ श्री’ स्पर्धेचे आयोजन; जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभाग घ्यावा

जाहिरात

 

शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कौस्तुभ गावडे प्रयत्नशील राहतील :राजे समरजितसिंह घाटगे यांचा विश्वास

schedule02 Nov 26 person by visibility 197 categoryराजकीय

◼️नवनिर्वाचित आमदार कौस्तुभ गावडे यांच्याकडून आभार व्यक्त

कागल : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवर नवनिर्वाचित झालेले आमदार कौस्तुभ गावडे यांनी शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले. यावेळी समरजितसिंह घाटगे यांनी छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा भेट देऊन आमदार गावडे यांचा सत्कार केला.

यावेळी आमदार कौस्तुभ गावडे यांनी कारखाना प्रांगणातील सहकारमहर्षी स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मोठ्या विश्वासाने कौस्तुभ गावडे यांना पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी दिली. पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांतील शिक्षकांनी त्यांच्या उमेदवारीला पाठबळ दिल्यामुळे विधान परिषदेतील सर्वांत तरुण आमदार म्हणून त्यांची निवड झाली. स्वर्गीय राजेसाहेबांपासून घाटगे, साळुंखे आणि गावडे कुटुंबीयांसह शाहू ग्रुप व विवेकानंद परिवाराचे ऋणानुबंध आहेत. आमदार कौस्तुभ गावडे हे अभ्यासू व्यक्तिमत्त्व असून, शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते निश्चितच प्रभावीपणे प्रयत्न करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार कौस्तुभ गावडे म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज असलेल्या राजे समरजितसिंह घाटगे यांनी आपल्या उच्च शिक्षणाचा आणि अनुभवाचा उपयोग कोल्हापूरच्या विकासासाठी करण्याच्या उद्देशाने राजर्षी शाहू स्टार्टअप मिशनसारखे महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केले आहेत. कोल्हापुरात प्रस्तावित आयटी पार्कसाठी आवश्यक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी त्यांचे सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. या उपक्रमांना चालना देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करू. नुकत्याच झालेल्या पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजे समरजितसिंह घाटगे यांच्या विचारांशी जोडलेल्या शिक्षकांनी दिलेल्या सहकार्यामुळेच हा विजय साकार झाला, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी शाहू उद्योग समूहाचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, सर्व संचालक, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes