राजापूरवाडी येथील आरोग्य शिबिरात २९७ नागरिकांची तपासणी
schedule02 Nov 26 person by visibility 161 categoryआरोग्य
◼️आरोग्य अभियानातील लाभार्थ्यांची संख्या १४ हजार ३९७ वर
कुरुंदवाड : सहकारमहर्षी स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिरोळ तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या मोफत आरोग्य व नेत्र तपासणी अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी (२ नोव्हेंबर) राजापूरवाडी येथे आयोजित आरोग्य शिबिरात १२५ नागरिकांची आरोग्य तपासणी, तर १७२ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. अशा एकूण २९७ नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.
आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन आणि शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, यड्राव यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे.
यापूर्वी राजापूर येथील शिबिरापर्यंत अभियानातील लाभार्थ्यांची एकूण संख्या १४ हजार १०० होती. त्यामध्ये राजापूरवाडी येथील आजच्या शिबिरातील २९७ लाभार्थ्यांची भर पडल्याने अभियानातील आजअखेरच्या एकूण लाभार्थ्यांची संख्या १४ हजार ३९७ झाली आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, विविध आजारांचे वेळीच निदान करणे आणि आरोग्याबाबत जनजागृती करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
यावेळी पंचायत समिती सदस्य अविनाश पाटील, राजाराम गोते, आप्पासो मगदूम, वाल्मीक कोळी, अनिल कोळी, राजकुमार गोते, समीर दानवाडे, श्रीकांत कोळी, अरुण गोते, संतोष गोते यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.