SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर : लोकशाही दिनी 22 तक्रार अर्ज दाखलमंत्रालयात पुनमताई तोडकर यांनी घेतली मंत्री छगन भुजबळ यांची सदिच्छा भेटकागल उरुसात भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या : मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अधिकाऱ्यांना सूचनाराजापूरवाडी येथील आरोग्य शिबिरात २९७ नागरिकांची तपासणीवारणा विद्यापीठाच्या पहिल्या युवा महोत्सवात कलागुणांचा जल्लोष!करवीर तालुक्यातील ५००० रेशन कार्ड धारकांचे बंद केलेले रेशन तात्काळ सुरू करा; शिवसेनेचे उचगाव येथे हुपरी-कोल्हापूर रस्ता रोको आंदोलनशिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कौस्तुभ गावडे प्रयत्नशील राहतील :राजे समरजितसिंह घाटगे यांचा विश्वासवीज पडून मृत्यू झालेल्या म्हाकवेतील तरुण शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना शासनाकडून चार लाखाची मदत.....महिला सक्षमीकरण हीच खऱ्या अर्थाने काळाची गरज : पुनमताई तोडकरगोकुळमार्फत ‘गोकुळ श्री’ स्पर्धेचे आयोजन; जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभाग घ्यावा

जाहिरात

 

करवीर तालुक्यातील ५००० रेशन कार्ड धारकांचे बंद केलेले रेशन तात्काळ सुरू करा; शिवसेनेचे उचगाव येथे हुपरी-कोल्हापूर रस्ता रोको आंदोलन

schedule02 Nov 26 person by visibility 163 categoryसामाजिक

कोल्हापूर  : करवीर तालुक्यातील सुमारे ५००० रेशन कार्ड धारकांचे शासनाकडून विविध जाचक अटी घालून बंद करण्यात आलेले रेशन तात्काळ पूर्ववत सुरू करावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) वतीने उचगाव येथे हुपरी-कोल्हापूर रस्त्यावर तीव्र स्वरूपाचे ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. दिवाळी तोंडावर असताना आणि राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती असताना गोरगरिबांच्या तोंडचा घास हिरावून घेणाऱ्या या शासनाचा यावेळी तीव्र निषेध करण्यात आला.
नेत्यांचा संताप आणि आंदोलनाची पार्श्वभूमी:
या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे आणि करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी केले. 

यावेळी बोलताना तालुकाप्रमुख राजू यादव म्हणाले की, "सध्याच्या शासनाने गोरगरिबांचे रेशन बंद करून त्यांच्या तोंडचा घास काढण्याचे पाप केले आहे. आय.टी. रिटर्न भरणाऱ्या किंवा टू-ह्विलर गाडी असणाऱ्या व्यक्तींना श्रीमंत समजून त्यांचे रेशन बंद करणे अन्यायकारक आहे. दैनंदिन जगण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी आय.टी. रिटर्न भरावाच लागतो, त्यामुळे हा नियम बेकायदेशीर आहे."

यापूर्वीही तहसीलदारांच्या दारात बोंब मारून आंदोलन करण्यात आले होते तसेच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र, शासनाकडून कोणतीही दखल न घेतल्याने अखेर रस्त्यावर उतरण्याची वेळ आल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले.

गांधीनगर पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल कदम यांना यावेळी निवेदन देण्यात आले. जनतेच्या या तीव्र भावना आपल्या खात्यामार्फत शासनापर्यंत पोहोचवाव्यात, अशी मागणी करण्यात आली. जर शासनाने यावर तातडीने निर्णय घेतला नाही, तर यापुढील आंदोलन थेट ‘पुणे-बेंगलोर नॅशनल हायवे’वर केले जाईल आणि होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील, असा सज्जड दमही नेत्यांनी दिला.

या आंदोलनात शहर प्रमुख विशाल देवकुळे, कामगार सेनेचे राजू सांगावकर, उपतालुकाप्रमुख राहुल गिरुले, अपंग सेनेचे संदीप दळवी, फेरीवाले संघटनेचे बाळासो नलवडे, युवा सेनेचे योगेश लोहार, वीरेंद्र भोपळे, उत्तम आडसूळ, सचिन नागटिळक, सागर पाटील, सुरज इंगवले, महादेव खोचगे, संतोष चौगुले, कैलास जाधव, दीपक पोपटाणी, अनिल माळी, अजित चव्हाण, बाबुराव पाटील, कृष्णात तुरुके, आनंदा मेंगाने, रामराव पाटील, वसंत पोवार, सचिन साळुंखे, संदीप तिकोडे, विवेक देसाई, सुभान फुलवाले, अनिल जाधव, गणेश चावरे, पृथ्वीराज माने, बाबासाहेब तामगावे, शहाजान फुलवाले, मोहन रजपूत, दत्तात्रय विभुते यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes