SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर : लोकशाही दिनी 22 तक्रार अर्ज दाखलमंत्रालयात पुनमताई तोडकर यांनी घेतली मंत्री छगन भुजबळ यांची सदिच्छा भेटकागल उरुसात भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या : मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अधिकाऱ्यांना सूचनाराजापूरवाडी येथील आरोग्य शिबिरात २९७ नागरिकांची तपासणीवारणा विद्यापीठाच्या पहिल्या युवा महोत्सवात कलागुणांचा जल्लोष!करवीर तालुक्यातील ५००० रेशन कार्ड धारकांचे बंद केलेले रेशन तात्काळ सुरू करा; शिवसेनेचे उचगाव येथे हुपरी-कोल्हापूर रस्ता रोको आंदोलनशिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कौस्तुभ गावडे प्रयत्नशील राहतील :राजे समरजितसिंह घाटगे यांचा विश्वासवीज पडून मृत्यू झालेल्या म्हाकवेतील तरुण शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना शासनाकडून चार लाखाची मदत.....महिला सक्षमीकरण हीच खऱ्या अर्थाने काळाची गरज : पुनमताई तोडकरगोकुळमार्फत ‘गोकुळ श्री’ स्पर्धेचे आयोजन; जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभाग घ्यावा

जाहिरात

 

वारणा विद्यापीठाच्या पहिल्या युवा महोत्सवात कलागुणांचा जल्लोष!

schedule02 Nov 26 person by visibility 224 categoryशैक्षणिक

◼️२५ स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; विजेत्यांना राज्यस्तरीय ‘इंद्रधनुष’ महोत्सवात संधी

वारणानगर : वारणा विद्यापीठाचा पहिला युवा महोत्सव विविध कला आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. लोककला, नृत्य, वक्तृत्व, वादविवाद, एकपात्री नाटक, मूकनाट्य यांसह २५ विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण केले. विजेत्या विद्यार्थ्यांना नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ‘इंद्रधनुष’ महोत्सवात विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.

वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष, डॉ. विनय कोरे आणि वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी, एन. एच. पाटील यांनी महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक, परीक्षक आणि सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

उद्घाटनप्रसंगी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी विद्यार्थ्यांनी कला सादरीकरणासोबतच त्यातून व्यावसायिक संधीही शोधाव्यात, असे आवाहन केले. श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. काराजिन्नी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. 

स्पर्धांमध्ये तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसीने आठ, यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाने चार, तात्यासाहेब कोरे अभियंत्रिकी महाविद्यालयाने सात, तर वारणा स्कूल ऑफ लॉने एका कला प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ परीक्षकांनी स्पर्धांचे परीक्षण केले.

यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. आर. बी. पाटील, प्रभारी वित्त व लेखाधिकारी डॉ. सी. आर. जाधव, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. एम. आर. जाधव, विद्यार्थी विकास कक्षाचे संचालक डॉ. एन. एस. धाराशिवकर, प्राचार्य डॉ. के. आय. पाटील, डॉ. डी. आर. धेडे, डॉ. ए. एस. शेरीकर, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. एम. एस. कामत, प्रा. आर. पी. भोकरे, प्रा. सुरेखा यादव, सांस्कृतिक विभागाचे प्रतिनिधी प्रा. एस. के. जंत्रे, प्रा. एम. एम. खुजट आणि सौ. एस. एस. काळे, सर्व अधिष्ठाता उपस्थित होते. बक्षीस वितरण समारंभाने महोत्सवाची सांगता झाली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes