SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डॉ. विलास व्ही. कारजिन्नी यांना ज्येष्ठ अभियंता (‘सीनियर इंजिनिअर) ऑनर २०२६’ पुरस्कारजागतिक खगोलशास्त्र दिन: अंतराळाचे रहस्य उलगडण्याचा दिवसशहापुरात मोठी कारवाई: ५ लाख ४ हजार रुपयांच्या एम.डी. ड्रग्जसह दोन आरोपींना अटक; स्थानिक गुन्हे शाखा आणि शहापूर पोलिसांची संयुक्त मोहीमकोल्हापुरात मोठी कारवाई: ७ किलो अफू पावडरसह राजस्थानी इसम गजाआड; १ लाखाचा मुद्देमाल जप्तकृष्णा नदीपात्रात ७०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग; पाटबंधारे विभागाला आमदार यड्रावकर यांच्या सूचना गौरी-गणपती विसर्जनासाठी कोल्हापूर महापालिकेची यंत्रणा सज्ज; ३०० आयशर, ६५० हमालांसह अडीच हजारांहून अधिक कर्मचारी तैनातवारणा विद्यापीठाच्या कोरे अभियांत्रिकीत आंतरराष्ट्रीय विद्यार्थिनीचा प्रवेशआयएसटीई नवी दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यकारी परिषद सदस्यपदी डॉ. महादेव नरके यांची बिनविरोध निवडपाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेची धडक मोहीम; महिनाभरात ५३ लाख ८२ हजाराची वसुली आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन: समान कामासाठी समान वेतन का गरजेचे?

जाहिरात

 

वारणा विद्यापीठाच्या कोरे अभियांत्रिकीत आंतरराष्ट्रीय विद्यार्थिनीचा प्रवेश

schedule18 Sep 26 person by visibility 440 categoryशैक्षणिक

◼️मोझांबिकच्या शिलुवाह सेलिया लुसियानो उआंबाची संगणक अभियांत्रिकीसाठी निवड

वारणानगर : वारणा विद्यापीठाचे अग्रणी महाविद्यालय तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (टीकेआयईटी), वारणानगर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी मोझांबिक देशातील विद्यार्थिनी शिलुवाह सेलिया लुसियानो उआंबा हिने संगणक विज्ञान व अभियांत्रिकी  या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. परदेशी नागरिक (Foreign National) प्रवर्गातून झालेल्या या प्रवेशामुळे टीकेआयईटीच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी समुदायात भर पडली आहे.

शिलुवाह हिचा प्रवेश १३ सप्टेंबर २०२६ रोजी निश्चित  झाला आहे. टीकेआयईटीमध्ये परदेशी विद्यार्थ्यांचा वाढता सहभाग हा संस्थेच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

याबद्दल वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी एन. एच. पाटील, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कारजिन्नी, प्राचार्य डॉ. के. आय. पाटील, अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे आणि अ‍ॅडमिशन इन्चार्ज डॉ. अमोल पाटील यांनी शिलुवाह हिचे अभिनंदन करून तिचे स्वागत केले. याप्रसंगी संग्राम दळवी, उदय पाटील, पंडीत जाधव उपस्थित होते.

टीकेआयईटीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण, गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक शिक्षण देत जागतिक स्तरावरील शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने हा प्रवेश महत्त्वाचा टप्पा असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes